इंजिनिअरिंगच्या प्रवेश अर्जासाठी मुदत वाढवली

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दहावी नंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (Diploma in Engineering) तसेच बारावी नंतरच्या प्रथम वर्ष औषधनिर्माणशास्त्र (Pharmacology) अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्यासाठी दि. ३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे…

दि. ३ सप्टेंबरपर्यंत रजिस्ट्रेशन (Registration) व फॉर्म कॉन्फर्मेशनसाठी (Form confirmation) (physical किंवा e scrutiny) मुदत असणार आहे.

तात्पुरती गुणवत्ता यादी दि. ५ सप्टेंबरला जाहीर होणार आहे. दि. ६ ते ८ सप्टेंबरपर्यंत त्रुटी, तक्रार अथवा कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. अंतिम गुणवत्ता यादी दि. ९ सप्टेंबरला जाहीर होईल.

यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा तपशील, उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना तसेच अर्ज भरण्यासाठी http://www.dtemaharashtra.gov.in/index.html या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *