Friday, April 26, 2024
Homeनाशिकनांदगावला एक्स्प्रेसचे थांबे पूर्ववत

नांदगावला एक्स्प्रेसचे थांबे पूर्ववत

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

नांदगाव रेल्वे स्थानकावर जनता, गोरखपूर कृशीनगर व कामयानी एक्सप्रेस या गाड्यांचे थांबे अखेर रेल्वे प्रशासनातर्फे मंजूर करण्यात आले आहे. येत्या 8 एप्रिलपासून ही सेवा पूर्ववत सुरू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.

- Advertisement -

करोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात रेल्वे प्रशासनाने अनेक रेल्वे गाड्यांचे थांबे रद्द केले होते. जनता, गोरखपूर कृशीनगर व कामयानी एक्सप्रेस या गाड्यांचा नांदगाव येथील स्थानकावरील थांबे रद्द करण्यात आले होते. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने इतर रेल्वे स्थानकांवरील रद्द थांबे पूर्ववत सुरू झाले असले नांदगाव येथील तिघा एक्स्प्रेसचे थांबे रद्दच होते. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. थांबे पुर्ववत करावेत यासाठी प्रवासी संघटनांतर्फे आंदोलने देखील करण्यात आली होती.

प्रवाशांची होत असलेली गैरसोय लक्षात घेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे जनता, गोरखपूर कुशीनगर व कामयानी एक्सप्रेस या गाड्यांचा नांदगाव येथील थांबा मंजूर करण्याबाबत मागणी केली होती. या संदर्भात रेल्वेमंत्र्यांनी तात्काळ सकारात्मक भुमिका घेत रेल्वे प्रशासनास सदर गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्यासाठी आदेश दिले होते. रेल्वे बोर्डाचे संयुक्त निर्देशक विवेक कुमार सिन्हा यांनी त्याबाबतचे आदेश निर्गमित केले असल्याने येत्या 8 एप्रिल पासून नांदगाव स्थानकावरील रेल्वेसेवा पूर्ववत होणार आहे.

या निर्णयामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय थांबणार आहे. प्रवासी संख्या विचारात घेऊन प्रायोगिक तत्वावर रेल्वे थांबे मंजूर केले आहेत. त्यामुळे रेल्वे सेवेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, या निर्णयासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे सहकार्य लाभले असल्याने त्यांचे नांदगावकरांतर्फे आपण आभार मानले असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या