Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यासंकटांचे घाव झेलत निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन

संकटांचे घाव झेलत निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात यावर्षी अवकाळी पावसाने न सोडलेली पाठ. सतत बदलते वातावरण, अशाही परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांनी जिगर दाखवत निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेतले आहे.यावर्षी निर्यातीसाठी जिल्ह्यातून 37 हजार शेतकर्‍यांनी 22 हजार 780 हेक्टर क्षेत्राची प्लॉट नोंदणी केलेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जादा प्रमाणात द्राक्ष निर्यात होतील,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात यावर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात अवकाळी पाऊस, धुके, थंडीचे कमी अधिक प्रमाण अशा वातावरणाने द्राक्ष उत्पादन घेण्यात शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या. द्राक्ष बागांच्या ऐन छाटणीच्या वेळी जिल्ह्यात ज्या भागात द्राक्ष बागा आहेत. त्या भागातच पाऊस झाल्याने त्याचा फटका निर्यातक्षम द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात बसला. या पावसामुळे अनेक बागांमधील द्राक्षमणी तडकणे तसेच कुज होणे असे प्रकार घडले आहेत. अशाही अडचणींवर मात करत द्राक्ष उत्पादकांनी आपली जिगर दाखवत निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी काही प्रमाणात म्हणजेच 10 ते 15 टक्क्यांनी निर्यात वाढेल,असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सन 2018-19 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातून एक लाख 46 हजार 113 मेट्रिक टन निर्यात झाली होती. त्यानंतर सन 2019-20 या आर्थिक वर्षात एक लाख 26 हजार 172 मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली आहे.

जिल्ह्यातून आतापर्यंत निर्यातक्षम द्राक्षाची निर्यात सुरू होते.मात्र, बदललेल्या वातावरणामुळे अजून निर्यात सुरू झालेली नाही. ती 1 फेब्रुवारी 2021 पासून सुरू होईल. यावर्षी सततच्या बदलत्या वातावरणामुळे 15 टक्के द्राक्ष माल खराब झाला आहे. दि.20 जानेवारीपासून द्राक्ष निर्यात सुरू होईल, असा अंदाज होता.मात्र, वातावरणामुळे यात बदल झाला आहे.यावर्षी निर्यातक्षम द्राक्षांना प्रती किलोमागे 20 रुपयांचा फटका बसला आहे. सध्या 80 ते 90 रुपये प्रतीकिलो निर्यातक्षम द्राक्षांना भाव आहे.डिसेंबर-जानेवारीमध्ये बदललेल्या वातावरणानंतर यापुढे वातावरणात बदल झाला नाही तर या वर्षीचा हंगाम चांगला होईल, असे कैलास भोसले यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातून युरोपियन देशांना द्राक्ष निर्यात होते.तसेच बांगलादेशमध्येही नाशिकच्या द्राक्षांना मोठी मागणी असते.मात्र, ढाका सीमेवर माल गेल्यानंतर तेथे ट्रक अडविल्या जातात. त्यामुळे द्राक्षांना फटका बसतो. हा प्रकार यापुढे होऊ नये, यासाठी आम्ही राज्य शासन, केंद्र शासनाला खासदारांंच्या माध्यमातून निवेदन दिले आहे.

– कैलास बोराडे , खजिनदार महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ.

- Advertisment -

ताज्या बातम्या