कांद्याची निर्यात सुरू करण्याची मागणी

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

शेवगावच्या बाजारसमितीत आवक वाढल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत. बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे कांद्याला परदेशात जास्त भाव मिळत असल्याने केंद्र सरकारने निर्यात वाढवावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी केंद्र सरकारकडे मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

यावर्षी शेतकर्‍यांनी गहू पेरणी करण्यापेक्षा कांदा या पिकामध्ये जास्त उत्पादन मिळेल या आशेने कांदा उत्पादन घेण्यासाठी भर दिला. कांदा लागवडीच्या सुरुवातीला तीस रुपये प्रति किलो दर मिळत होता. परंतु कांदा काढणीला येईपर्यंत दहा रुपयेपेक्षाही खाली दर आल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे कांद्याचा उत्पादन खर्च वाढल्याने कांदा लागवडीसाठी दहा हजार रुपये खर्च लागत आहे. तसेच डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे नांगरट, रोटा याचाही खर्च वाढला त्यातच सुरुवातीला थंडी कमी असल्यामुळे व ढगाळ हवामान असल्यामुळे कांद्याला मररोग वाढला.

त्यामुळेऔषधाचा खर्च मोठ्या प्रमाणात झाला या वर्षी औषधाच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. रासायनिक खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झाल्यामुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आले आहे तसेच शेतीपंपाची लाईट अनेक भागात कट केल्यामुळे कांद्याला पाणी देता आले नाही. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. एक क्विंटल कांद्यासाठी दोन गोण्या खरेदी करावा लागतात एका गोणी ची किंमत 40 रुपये असल्यामुळे एक क्विंटल कांदागोण्यासाठी 80 रुपये मोजावे लागतात वाहतुकीसाठी गोणीमागे पन्नास रुपये द्यावे लागतात त्यामुळे शेतकर्‍यांना तातडीने न्याय देण्याची गरज आहे.

तसेच 2022 मध्ये शेतकर्‍यांचे उत्पादन दुप्पट करू आशी आश्वासन केंद्र सरकारने वारंवार दिलेली आहे तरी आता परदेशामध्ये कांदा या पिकाला चांगली मागणी असल्यामुळे केंद्र सरकारने तातडीने निर्यात चालू करावी व कांदा उत्पादक शेतकर्‍यांना न्याय द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केंद्र सरकारकडे निवेदनाद्वारे केली आहे तातडीने उपाययोजना न केल्यास कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *