Friday, April 26, 2024
Homeनगरकांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याची शेतकर्‍यांची मागणी

कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याची शेतकर्‍यांची मागणी

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा परिसरातील शेतकर्‍यांच्या कांद्याला उत्पन्नाच्या प्रमाणात भाव मिळत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी हवालदिल झाले असून पुढील हंगामाची तयारी कशी करावी या चिंतेत शेतकरी सापडला असून कांद्यावरील निर्यातबंदी केंद्र शासनाने उठवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

- Advertisement -

शेतकरी शेती करताना पुढील आर्थिक नियोजन करीत असतो. परंतु खर्चाच्या प्रमाणात उत्पादीत मालाला भाव मिळाला नाही तर शेतकरी आर्थिक अडचडीत येत आहे. शिवाय सरकारने कांद्याची निर्यातबंदी केल्यामुळे कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. मजुरांनाही मजुरी मिळणे अवघड झाले आहे. कांदा साठविणे अडचणीचे होत असून जोपर्यंत योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत कांदा टिकवून ठेवणे देखील अवघड आहे. अल्प भुधारक शेतकरी मोठ्या आर्थिक संकाटात आला आहे. शासनाने कांद्याची निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या