Friday, April 26, 2024
Homeनगरशॉर्टसर्किटमुळे गॅस सिलेंडरचा स्फोट; अग्नितांडवात संसार भस्मसात

शॉर्टसर्किटमुळे गॅस सिलेंडरचा स्फोट; अग्नितांडवात संसार भस्मसात

राहुरी । Rahuri

विजेच्या शॉर्टसर्किटमुळे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन या अग्नितांडवात संसार भस्मसात झाला. मात्र घरातील कुटुंब वेळीच सावध होऊन बाहेर पडल्याने सुदैवाने मोठी जिवितहानी टळली.

- Advertisement -

ही घटना शनिवारी (दि.२ ) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. राहुरी खुर्द येथे नगर-मनमाड हायवे लगत असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या श्रीदत्त वसाहतीमध्ये एका घरात आज (शनिवारी) पहाटे साडेचार वाजता गॅसच्या भरलेल्या सिलेंडरचा स्फोट झाला. घरातील व्यक्ती तात्काळ बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. परंतु, पसरलेल्या अग्नितांडवात एका नवीन दुचाकीसह घरातील चारही खोल्यांमधील लाखो रुपये किंमतीच्या चीजवस्तू, कपडे, किराणा, अन्नधान्य, महत्वाची कागदपत्रे व इतर सामानांची राखरांगोळी झाली.

अशोक आत्माराम पाटील (रा. श्रीदत्त वसाहत, राहुरी खुर्द) यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने अग्नितांडव घडले. ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे विभागात कृषी सहाय्यक पदावर कार्यरत आहेत. तर त्यांच्या कुटुंबात एकूण सहा सदस्य आहेत. पाटील हे मंदिरात तर उर्वरित कुटुंब घरीच होते. मात्र प्रसंगावधानतेमुळे ते बालंबाल बचावले.

- Advertisment -

ताज्या बातम्या