Saturday, April 27, 2024
Homeराजकीय'म्हणून' मी अयोध्येला गेलो नाही; कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे स्पष्टीकरण

‘म्हणून’ मी अयोध्येला गेलो नाही; कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे स्पष्टीकरण

मुंबई : Mumbai

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अलीकडेच आपल्या सहकाऱ्यांसमवेत अयोध्या दौरा केला, या दौऱ्याची मोठी चर्चा सर्वत्र झाली. त्याबरोबरच त्यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावेळी काही आमदार आणि खासदार गैरहजर असल्यामुळे त्याविषयी वेगवेगळ्या पद्धतीने तर्कवितर्क काढले जाऊ लागले.

- Advertisement -

या दौऱ्यावेळी 3 आमदार आणि एका खासदाराच्या नाराजीमुळे वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. त्यामध्ये कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आमदार शहाजी बापू पाटील, अपक्ष आमदार बच्चू कडू आणि खासदार भावना गवळी (MP Bhavna Gawli) यांची अनुपस्थिती विशेष होती म्हणून त्यांच्या नाराजीची चर्चा होत होती.

एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाची क्रू मेंबरला मारहाण; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) सध्या अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या भागांचा दौरा करत आहेत. या दौऱ्यादरम्यान, त्यांनी नाराजीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ रामाबद्दल माझ्या मनामध्ये एक तीळमात्र शंका नाही.

मी एक राम भक्तच आहे. काही ठिकाणी हे जे शेतकरी बांधवांवर संकट आलं आहे. ते पाहणीसाठी मी दौरा काढला आता जालना झाला संभाजीनगर झाला त्यानंतर बीड झाला परभणीचा काही भाग मी पाहिला. आज मी दोन-तीन जिल्हे पाहणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

अकोला, बुलढाणा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री आमच्याकडेही छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसणं हेही रामाचंच काम आहे. त्यासाठी मी अयोध्येला गेलो नाही, अशी प्रतिक्रिया सत्तार यांनी दिल्यामुळे त्यांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या