आगाराकडून ठोस उपाययोजना अपेक्षित

jalgaon-digital
2 Min Read

सिन्नर । वार्ताहर Sinnar

नाशिक महानगरपालिकेकडून (Nashik Municipal Corporation) सिटीलिंक बसेसची (Citylink buses) सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळानेही (ST Mahamandal) ठोस उपाययोजना राबवून सिटीलिंक बस व महामंडळाच्या बसेसमधील (Buses) तफावत दुर करण्याचा प्रयत्न करावा व प्रवाशांना लालपरी आपलीच आहे हा विश्वास द्यावा असे आवाहन तालुका प्रवासी संघटनेचे (Travel Association) सचिव सतिश मुळे यांनी सिन्नर (Sinnar) आगार व्यवस्थापकांना पत्र देऊन केले आहे.

कोरोना (corona) काळात महामंडळाने चांगली सेवा दिली. मात्र, कोरोनाच्या संकटामूळे अनेक बंधंनं आल्याने अजूनही एस. टी. सेवा म्हणावी अशी सुरळीत होऊ शकलेली नाही. त्यातच भर म्हणून महानगरपालिकेने तपोवन-पंचवटी (tapovan-pachavati) ते सिन्नर व वावीवेस मार्ग तहसिल कार्यालय येथे बसेस सुरू केलेल्या आहेत. या बसेसमुळे दररोज ये जा करणार्‍या प्रवाशांची तहसिल कार्यालय, न्यायालय, पंचायत समिती, नगरपरिषद, विविध शाळा, वावी वेस, विजयनगर भागातील प्रवाशांची सोय झाली आहे व त्याची अर्थिक बचतही होत आहे.

त्याच्या गाड्यांचे नियोजन व प्रवासी सेवा देखील उत्तम आहे. मात्र, या कारणाने नवीन समस्या व स्पर्धा निर्माण झालेली आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी सिन्नर आगाराने सतर्क राहून ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. सिटीलिंक व महामंडळाचे तिकिट दर यामधील तपशिलाचा बोर्ड प्रवाशांच्या माहितीसाठी असावा, महामंडळाच्या अपंग सवलती, जेष्ठ नागरीक सवलती, विद्यार्थी प्रवास सवलत, तिमाही व मासिक पास सवलती ज्या सिटिलिंक देवू शकत नाही त्याविषयी प्रवाशांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे.

काही विना थांबा सिन्नर-नाशिक (Sinnar-Nashik) बसेस सुरु कराव्यात. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांच्या वेळेत बचत होईल. बर्‍याच वर्षापूर्वी महामंडळाने एक समिती तयार केली होती. या समितीमध्ये शहरातील सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी, महामंडळाच्या संघटनेचे प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी घेण्यात आले होते. समितीची दोन महिन्यात सभा घेण्यात येत होती. त्यात प्रवाशांच्या, कर्मचार्‍यांच्या अडचणी समजावून घेवून त्यावर उपाय सुचविले जात होते.

निरनिराळे उत्सव, प्रवासी दिन, ग्राहक दिन विविध योजना राबविल्या जात होत्या. अशी समिती पुनश्च स्थापन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यातून एस.टी. ची प्रवासी संख्या वाढेल व आगाराचे उत्पन्नाही वाढेल. त्यामूळे अशा उपाय योजना तातडीने राबवाव्यात असे आवाहन निवेदनात शेवटी करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *