Friday, April 26, 2024
Homeनाशिकराजे संभाजी स्टेडियमचे काम बंद अवस्थेत

राजे संभाजी स्टेडियमचे काम बंद अवस्थेत

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

राजे संभाजी स्टेडियमच्या विस्तारासाठी सुमारे तब्बल 20 वर्षानंतर ‘खेलो इंडिया खेलो’ योजनेअंतर्गत राजेसंभाजी स्टेडियमच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारकडून 6 कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

- Advertisement -

नवीन विस्तारीकरण होणार्‍या क्रीडांगणामध्ये बास्केट बॉल, लॉन टेनिस, स्पोर्ट्स अकेडमी अँड ट्रेनिंग सेंटर, हॉस्टेल इमारत, अत्याधुनिक लायब्ररी, एक्सेसेटिंग सिटिंग गेलरी, अत्याधुनिक व्ही आय पी गेलरी, व उपहारगृह या सुविधा होणार होत्या. मात्र अर्ध्यातच सदर काम बंद पडल्याने क्रीडा प्रेमीमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

सध्या या ठिकाणी मातीचे ढीग पडून आहेत. यासोबतच जॉगिंग ट्रॅक शेजारीच अर्धवट अवस्थेत केलेल्या कामामुळे राजे संभाजी स्टेडियमला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. या स्टेडियमवर सकाळी 4 वाजेपासून व्यायाम प्रेमींसह ज्येष्ठ नागरिकांची गर्दी जमलेली असते अशातच नवीन सुरू केलेले काम बंद अवस्थेत असल्याने पुर्वीचेच स्टेडियम काय वाईट होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नासाठी आता नेमकी दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न नागरिकांना निर्माण झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या