Saturday, April 27, 2024
Homeनाशिकदुर्मिळ नोटांचे आजपासून प्रदर्शन

दुर्मिळ नोटांचे आजपासून प्रदर्शन

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

भारतात ब्रिटिशांनी सर्वप्रथम नाशिकरोड ( Nashikroad ) येथे 1924 साली नोटांचा कारखाना सुरू केला. तेव्हापासून आतापर्यंत छापलेल्या नोटांचे प्रदर्शन (Exhibition of currency notes )जेलरोडच्या नोट प्रेससमोरील रिसर्च अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट इमारतीत 8 जूनला भरणार आहे. नागरिकांसाठी हे प्रदर्शन 9 आणि 10 जूनला सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत खुले राहणार आहे. त्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे.

- Advertisement -

या प्रदर्शनाचे उद्घाटन खा. हेमंत गोडसे, नवी दिल्लीतील प्रेस महामंडळाच्या सीएमडी तृप्ती पात्रा घोष यांच्या हस्ते आज होणार आहे. नोटप्रेसची स्थापना 1924 साली झाली. सध्याच्या आयएसपीमध्येच 1928 पासून नोटांची छपाई सुरु झाली.

1962 साली जेलरोडला करन्सी नोट प्रेस स्वतंत्रपणे सुरु झाली. स्थापनेपासून नोटप्रेसमध्ये एक रुपयाच्या नोटेपासून एक हजार, पाच हजार, दहा हजारापर्यंतच्या नोटा छापण्यात आल्या. सध्या पाच, दहा, वीस, पन्नास, शंभर, दोनशे आणि पाचशेच्या नोटांची छपाई रात्रंदिवस सुरु असते.

नोट प्रेसचा इतिहास, मशिनरी, नोटा छापण्याची प्रक्रिया याची माहिती प्रदर्शनातून मिळणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त होणार्‍या या प्रदर्शनात मुद्रणकलेत काळानुसार झालेल्या बदलांची माहितीही मिळणार आहे.

नोट प्रेसचे मुख्य महाव्यवस्थापक बोलेवर बाबू, आयएसपीचे मुख्य महाव्यवस्थापक राजेश बन्सल, प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, प्रविण बनसोडे, जयराम कोठुळे, प्रेस महामंडळाचे संचालक एस. के. सिन्हा, सीएनपीचे महाव्यवस्थापक महापात्रा, आयएसपीचे व्यंकटेशकुमार अजय अग्रवाल, योगेश कुलवधे, राहुल रामराजे, बाळासाहेब ढेरिंगे यांची प्रमुख उपस्थिती राहील.

- Advertisment -

ताज्या बातम्या