Wednesday, April 24, 2024
Homeनगरथकबाकीदारांना दिलासा : 75 टक्के शास्तीमाफीला दिली मुदत वाढ

थकबाकीदारांना दिलासा : 75 टक्के शास्तीमाफीला दिली मुदत वाढ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

थकील मालमत्ता करावरील (Exhausted Property Tax) 2 टक्के शास्ती आकारणीवर 75 टक्के सुट देण्याचा निर्णय महापालिकेने (Municipal Corporation) घेतला आहे. थकीत मालमत्ताधारकांना (Exhausted Property) 30 नोव्हेंबरपर्यंत याचा लाभ घेता येईल, असे महापालिकेने (Municipal Corporation) स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

थकीत मालमत्ता करावरील शास्तीवर सुट (Exemption from Penalty on Overdue Property tax) मिळावी, अशी मागणी आ. अरूण जगताप (MLA Arun Jagtap) व आ. संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी महापालिकेकडे पत्राद्वारे केली होती. त्यानंतर महापालिकेने शास्तीमाफीचा निर्णय घेतला आहे. 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या काळात करभरणार्‍यांना शास्तीमाफीचा लाभ घेता येईल.

2 टक्के शास्ती आकारणीवर 75 टक्के सूट देण्यात येणार आहे. ही सूट वगळता उर्वरित रक्कम एकरकमी भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी अधिकार व कर्मचार्‍यांनी प्रभावी कामगिरी करून 100 टक्के करवसुली करावी, अशा सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या