प्रभारी कार्यकारी अधिकार्‍यांनी दोन कर्मचार्‍यांना दिले बदलीचे आदेश !

jalgaon-digital
1 Min Read

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानचे प्रभारी कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी संस्थानच्या दोघा कर्मचार्‍यांना बदलीचे आदेश

दिल्याने कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान एकप्रकारे जणू त्यांना व्हॅलेंटाईनचे गिफ्ट मिळाले असल्याची चर्चा कर्मचार्‍यांमध्ये ऐकायला मिळाली.

रविवार दि. 14 फेब्रुवारी रोजी साईबाबा संस्थानच्या जनसंपर्क विभागातील संतोष ढेमरे तसेच वाहन विभागाचे अण्णासाहेब जाधव यांच्या साईबाबा संस्थानचे प्रभारी कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी तडकाफडकी बदल्यांचे आदेश काढले असून सुट्टीच्या दिवशी अशाप्रकारे अधिकारी वर्गाला आदेश काढता येतात का? याची सोमवारी शिर्डी शहरात दिवसभर चर्चा सुरू होती. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे सध्या रजेवर असून त्याजागी प्रभारी म्हणून उप कार्यकारी अधिकारी यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

यातील एका कर्मचार्‍याला मागील दोन महिन्यांत दंडात्मक कारवाईसह मोठा भुर्दंड बसला आहे. जनसंपर्क विभागातील संतोष ढेमरे यांच्या ड्युटीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील साईदरबारी दर्शनासाठी आले असता त्यांच्यासोबत असलेल्या मंडळींनी दर्शनपास न घेता मंदिरात प्रवेश मिळवला होता.

याचा भुर्दंड साईसंस्थानने त्यांच्या खिशातून वसूल करत चक्क 9 हजार रुपये भरून घेतले. तसे पाहिले तर यामध्ये पासेस तपासणी करून मंदिरात सोडण्याची जबाबदारी सुरक्षा रक्षकांवर आहे का? अन्य कोणावर, त्यामुळे सुरक्षा यंत्रणेच्या चुकीचे खापर ढेमरे यांच्या डोक्यावर फोडले का? अशीही चर्चा कर्मचार्‍यांमध्ये आहे. संस्थान प्रशासनाची कडक कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *