Friday, April 26, 2024
Homeनगरमयत सभासद वगळून नागवडे कारखान्याच्या २१ हजार ५१४ सभासदांना मतदानासाठी पात्र ठरवावे

मयत सभासद वगळून नागवडे कारखान्याच्या २१ हजार ५१४ सभासदांना मतदानासाठी पात्र ठरवावे

श्रीगोंदा | प्रतिनिधी | Shrigonda

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे २२ हजार ७११ सभासद आहेत.

- Advertisement -

त्यातील १ हजार १९७ सभासद मयत आहेत. हे मयत सभासद वगळून राहिलेले २१ हजार ५१४ सभासद अंतिम मतदार यादीत समाविष्ट करावेत, अशी आग्रहाची मागणी प्रारूप यादीवरील दि.२५ फेब्रुवारी २०२१ रोजी होणाऱ्या हरकतीवरील सुनावणीच्या वेळी मांडणार असल्याची माहिती श्रीगोंदा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रा. तुकाराम दरेकर यांनी दिली.

नागवडे सहकारी साखर कारखान्याने व्यक्तिगत सभासदांचे आणि सोसायटी सभासदांचे क्रियाशील आणि अक्रियाशील हे केलेले वर्गीकरण चुकीचे आणि बेकायदेशीर आहे.

प्रा.दरेकर म्हणाले, पुण्याच्या प्रादेशिक साखर सहसंचालकांनी भवानीनगर साखर कारखान्यामध्ये मयत सभासद वगळून बाकीचे थकबाकीदारांसह सर्व सभासद अंतिम मतदार यादीत घेतले होते. दि.२४ जानेवारी २०२० रोजी नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी एका वृत्तपत्रात बातमी देऊन भवानीनगरच्या मतदार यादीला दुजोराही दिलेला आहे. त्याप्रमाणेच आता नागवडे सहकारी साखर कारखान्याची अंतिम मतदार यादी करण्यात यावी.

नागवडे साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने दि.३० नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या सभेच्या ठराव नंबर ६ (१) ने पाच वर्षे कालावधीतील ऊस पुरवठ्याची अट शिथिल केलेली आहे. दि.२३ डिसेंबर २०१९ च्या संचालक मंडळाच्या ठरावाने शेअर्स पूर्ण करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे. दि. २६ जानेवारी २०२० च्या ठराव क्रमांक ९ ने थकबाकीदार व मयत सभासद वगळून बाकीचे सर्व अंतिम मतदार करण्यास मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे प्रारुप मतदार यादीत पाठविलेल्या ९ हजार ५८९ पात्र सभासदांची संख्या बदलून ती ११ हजार ९२५ ने वाढू शकते आणि एकूण पात्र सभासद संख्या २१ हजार ५१४ पर्यंत होऊ शकते.

आता नागवडे सहकारी साखर कारखान्याने दि.२१ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये ठराव क्रमांक १२ अन्वये संस्था सभासदांची वार्षिक सभेची उपस्थिती क्षमापित केलेली आहे. त्यामुळे ४३ पैकी अक्रियाशील ठरविलेल्या ३३ सोसायट्यांचे ठराव होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता २१ हजार ५१४ व्यक्तिगत सभासद होऊ शकतील आणि सर्वच्या सर्व म्हणजे ४३ सोसायट्या मतदार यादीत येतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या