Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यायुवा शेतकर्‍याकडून आदर्श शेतीचे उदाहरण

युवा शेतकर्‍याकडून आदर्श शेतीचे उदाहरण

भऊर | वार्ताहर Bhaur

देवळा ( Deola )येथील शेतकर्‍यांचा मका, कांदा, कोबी तसेच भाजीपाला पिकांच्या लागवडीकडे कल असतो.मात्र काही प्रयोगशील शेतकरी ( Farmers )वेगळी वाट निवडतात. येथील एका युवा शेतकर्‍याने 70 दिवसात सुमारे 100 टन कलिंगडाचे उत्पादन घेऊन आदर्श शेतीचे उदाहरण दाखवून दिले आहे.

- Advertisement -

गावातील विशाल संजय बच्छाव (Vishal Sanjay Bachhav )या युवा शेतकर्‍याने आपल्या आणि वाट्याने घेतलेल्या शेतीतून अवघ्या सत्तर दिवसात टरबुजाचे (watermelon )शंभर टनाहून अधिक उत्पादन घेत दहा लाखाचे उत्पन्न घेतले.

विशाल याने आपल्या वडिलोपार्जीत शेतीसोबतच भावकीतील कैलास बच्छाव यांची चार एकर शेती वाट्याने करावयास घेतली आहे. गेल्या तीन वर्षापासून ते टरबूज तसेच भाजीपाला पिक घेतात. मागील वर्षी करोनाच्या दुसर्‍या लाटेने टरबुजाचे व्यापारी न मिळाल्याने व कमी बाजार भावामुळे त्यांचे नुकसान झाले.

मात्र चालू वर्षी फेब्रुवारीत ठिंबक सिंचनाचा उपयोग करून मल्चिंग अंथरून व बियाण्यांचा वापर करून चार एकर क्षेत्रात लागवड केली.पाण्याचे व फवारणीचे योग नियोजन करत बहारदार पिक घेतले. नुकतीच टरबूज पिकाची काढणी सुरु असून चार एकर क्षेत्रात आजपर्यत 100 टन टरबूज निघाले आहे. अजून 15 ते 20 टन चांगल्या प्रतीचा माल निघणार असून राहिलेल्या दुय्यम माल देखील 10 टनापर्यंत निघेल अशी आशा आहे. सटाणा येथील व्यापार्‍यांच्या माध्यमातून त्यांनी हा संपूर्ण माल जम्मूकाश्मीर येथे पाठवला आहे.

पीक नियोजनात गावातील शेतकरी मित्र त्याचबरोबर परिसरातील प्रयोगशील शेतकर्‍यांच्या शेतीस भेट देत त्याने टरबूज पिकात हातखंडा मिळवला आहे. शेतीतील सर्व कामे कुटुंबातील सदस्य आई, वडील, भाऊ व स्वतःच्या देखरेखेखाली आवश्यक तेथे मजुरांची मदत घेत केली आहेत. आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून या शेतकर्‍याने चार एकरात टरबूज फळपिकाची लागवड करून तब्बल दहा लाख रुपयांचे विक्रमी उत्पादन घेतले.

टरबूजाचा दर्जा व गोडवा चांगला असल्याने पहिल्याच तोडणीत 100 टन टरबूज 10 रूपये किलो दराने व्यापार्‍याने खरेदी केले. आदर्श टरबूज लागवडीपासून ते उत्पन्न निघेपर्यंत योग्य प्रकारे काळजी घेण्यात आली. त्यामुळे भरघोस उत्पन्न निघाले. पहिल्या तोडणीत चांगला भाव मिळाल्याने त्यांना सत्तर दिवसात दहा लाखांचे उत्पन्न झाले.

कष्टाने शेतीत झोकून देऊन काम करण्याची पद्धत व पिकाची सखोल अभ्यासपूर्ण माहिती यामुळे विशालने यशस्वी टरबूज उत्पादन घेतले असून त्याच्या कष्टाची हि पावती आहे.

कैलास बच्छाव, शेतकरी खामखेडा.

- Advertisment -

ताज्या बातम्या