Thursday, April 25, 2024
Homeनाशिक८ ‘क’ उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी

८ ‘क’ उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी

नाशिक । प्रतिनिधी

तलाठी भरतीप्रक्रियेने वेग घेतला असून जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.17) प्रतीक्षा यादीतील 8 ‘क’ उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. मंगळवारी (दि.18) उर्वरीत उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.

- Advertisement -

जुलै 2019 मध्ये 24 दिवस शहरातील विविध परिक्षा केंद्रांवर परीक्षा सुरू होती.तलाठी जागेसाठी ऑनलाईन परीक्षा झाली होती. त्यासाठी 22 हजार 853 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. विधानसभा निवडणुकीमुळे निकालनांतर प्रतीक्षा यादी प्रसिध्द होण्यास विलंब झाला होता. जिल्हाधिकार्‍यांच्या अधिकार कक्षेत येणार्‍या तलाठी परिक्षेच्या निकालानंतर तब्बल दोन महिन्यांनी प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली.

या यादीतील उमेदवरांच्या कागदपत्रंची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी 8‘क’उमेदवारांच्या कागदपत्रंची तपासणी करण्यात आली. अर्जासोबत जातीचा दाखला, शैक्षणिक अर्हता, शाळेचा दाखला आणि रहिवासी पुरावा असेल्या मुळ कागदपत्रंची तपासणी करण्यात आली. दुसर्‍या टप्प्यात आणखी 83 उमेदवारांच्या कागदपत्रंची तपासणी केली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या