Saturday, April 27, 2024
HomeUncategorized'जिथे तुमची शाळा तिथेच परीक्षा केंद्र'

‘जिथे तुमची शाळा तिथेच परीक्षा केंद्र’

औरंगाबाद – Aurangabad

कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल-मे मध्ये दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षांसाठी औरंगाबाद विभागातून दहावीच्या एक लाख 84 हजार 963 हजार विद्यार्थ्यांनी, तर बारावीच्या एक लाख 53 हजार 670 विद्यार्थ्यांनी आवेदन पञ भरले आहे. विद्यार्थ्यांची जिथे शाळा तिथेच परीक्षा घेण्याचे नियोजन औरंगाबाद विभाग करत आहे, अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी दिली आहे.

- Advertisement -

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान आणि इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान परीक्षा होणार आहे. या परिक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून जेथे विद्यार्थ्यांची शाळा आहे, तेथेच परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमिवर विद्यार्थ्यांची जिथे शाळा तिथेच परीक्षा घेण्याचे नियोजन औरंगाबाद विभाग करत आहे. यंदा औरंगाबाद विभागातून दहावीच्या एक लाख 84 हजार 963 हजार विद्यार्थ्यांनी, तर बारावीच्या एक लाख 53 हजार 670 विद्यार्थ्यांनी आवेदन पञ भरले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढतो आहे. अशा परिस्थितीत दहवी-बारावीची परीक्षा घेणे मोठे जोखमेचे ठरणार आहे. या परीक्षेदरम्यान फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत परीक्षा पार पाडावी लागणार आहे. त्यानुसार आता जिथे शाळा तिथेच परीक्षा केंद्राचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या