Saturday, April 27, 2024
Homeनाशिकमाजी सैनिकांना मालमत्ता करात सूट

माजी सैनिकांना मालमत्ता करात सूट

मुंजवाड | वार्ताहर | Munjwad

कष्टकरी शेतकरी (Farmer) आणि देशाच्या सिमेवर तैनात सैनिक (Soldier) उन्हातान्हात काम करतात. दोघांच्या व्यथा सारख्याच असल्याने त्यांच्याविषयी सर्वांच्या मनात आगळेवेगळे स्थान आहे…..

- Advertisement -

माजी सैनिकांसाठी मालमत्ता करात सूट देण्याचा महत्त्वपुर्ण शासनाने (Government) निर्णय घेतला असून कृषी विभागात (Agriculture Department) तीन टक्के विविध योजना राखीव ठेवण्याच्या निर्णयावर लवकरच अंमलबजावणी होणार असल्याची माहिती कृषी व सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी येथे बोलतांना दिली.

सटाणा (Satana) येथील जय मल्हार लॉन्समध्ये बागलाण सैनिक संघातर्फे आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना भुसे बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. दिलीप बोरसे तर प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे उपस्थित होते.

यावेळी संघाच्या फलकाचे अनावरण ना. भुसे यांच्या हस्ते झाले. सेवानिवृत्तीनंतर सैनिकांना आपल्या गावाजवळच नोकरी मिळण्याची तरतूद व्हावी. तसेच आजी-माजी सैनिकांसाठी हक्काचे मंगल कार्यालय झाले पाहिजे.

जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीमध्ये माजी सैनिकांसाठी 5 टक्के निधीची तरतूद होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे भुसे यांनी सांगितले. देशाच्या सिमेवर कर्तव्य बजावून सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांचा भुसे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

माजी सैनिकांचा आयुष्यमान भारत योजनेत सहभाग होण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची ग्वाही आ. बोरसे यांनी दिली. यावेळी डॉ. शेवाळे यांच्या हस्ते वीरपत्नी व मातांना येवला येथील व्यावसायिक प्रकाश शिंदे (Prakash Shinde) यांनी आणलेल्या पैठणींचे (Paithani) वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास बागलाण सैनिक संघाचे तालुकाध्यक्ष महेश गांगुर्डे, योगेश पाटील, किरण सावकार, योगेश पवार, दीपक कापडणीस, अ‍ॅड. रेखा शिंदे, माजीसैनिक दिलीप हिरे, काशिनाथ पवार, दिनकर पवार, विजय देवरे, वीरपत्नी कल्पना रौंदळ, रेखा खैरनार, प्रमिला रौंदळ, निमा जाधव, सुशिला कापडणीस, शांता जगताप, छबाबाई खैरनार आदिंसह आजी-माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेंद्र पवार यांनी केले शेवटी महेश गांगुर्डे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या