पाच लाखांच्या रक्कमेसह माजी सैनिकाची कार पळवली

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

माजी सैनिकाने वापरण्यासाठी घेतलेली चार लाख 50 हजाराची कार व त्यामध्ये ठेवलेली पाच लाख 10 हजारांची रोख रक्कम, दोन चांदीच्या अंगठ्या, कागदपत्रे असा नऊ लाख 70 हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.

9 जून रोजी सायंकाळी साडे सात ते 10 जून रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या दरम्यान मिस्कीन मळा रोड, तारकपूर येथे ही घटना घडली. याप्रकरणी माजी सैनिक अमोल शंकर बोचरे (वय 39 रा. साकत खुर्द ता. जि. नगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोचरे यांनी सन 2021 मध्ये पंकेश गोरक्षनाथ ढोकणे (रा. उंबरे ता. राहुरी) यांच्या नावावर असलेली कार (एमएच 17 सीएम 6970) नोटरी न करता वापरण्यासाठी घेतली होती.

बोचरे यांनी कार 9 जून रोजी सायंकाळी साडे सात वाजता त्यांची बहिण वर्षा बाळासाहेब टेमक (रा. मिस्कन मळा रोड, तारकपूर) यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत लावली होती. कारमध्ये पाच लाख 10 हजार रुपये, दोन चांदीच्या अंगठ्या व महत्वाची कागदपत्रे होती. चोरट्यांनी कारसह रोख रक्कम, अंगठ्या व कागदपत्रे चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 10 जून रोजी सकाळी साडे नऊ वाजता सदरचा प्रकार लक्षात आला असून 13 जून रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलीस कारचा शोध घेत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *