माजी सैनिकांना मालमत्ता करात सूट – सौ. तांबे

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

देशाच्या संरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता निःस्वार्थीपणे काम करणार्‍या सर्व माजी सैनिकांचा उचित सन्मान व्हावा,

यासाठी राज्यातील आघाडी सरकारने नगरपालिका कार्यक्षेत्रात राहणार्‍या माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नी यांना मालमत्ता करात पूर्ण सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर नगरपरिषदेकडून तातडीने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी दिली.

सौ. तांबे म्हणाल्या, माजी सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावली असून जीवाची पर्वा न करता देशाचे संरक्षण केले आहे. त्यांची देशसेवा लक्षात घेऊन त्यांना उचित सन्मान व्हावा,

यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळाने स्व.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजना अंतर्गत पूर्णपणे मालमत्ता व घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याच्या अंमलबजावणीची संगमनेर नगरपरिषदेने प्रथम सुरुवात केली आहे. शासनाच्या विविध योजना अत्यंत प्रभावीपणे व तातडीने राबवून संगमनेर नगरपरिषदेने कायमच सामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे.

माजी सैनिकांचे कार्य लक्षात घेऊन नगराध्यक्षा सौ.तांबे यांनी मागील तीन वर्षांपासून दिवाळीच्या वेळेस माजी सैनिकांना फराळ पाठविणे, रक्षाबंधनानिमित्त राख्या पाठविणे असे विविध उपक्रम राबविले आहेत. तसेच प्रत्येक गावोगावी माजी सैनिकांचा उचित सन्मान व्हावा यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

नगरपरिषदेने घेतलेल्या या धोरणात्मक निर्णयामुळे माजी सैनिकांचा संगमनेर नगरपालिकेने सन्मान केला असून याकामी नगराध्यक्षा सौ. तांबे, उपनगराध्यक्षा सौ. सुमित्राताई दीड्डी, सर्व सभापती, सर्व नगरसेवक, नगरसेविका व मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी तातडीने योजना राबविल्याबद्दल नागरिकांमधून व माजी सैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *