Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकमाजी आमदार अनिल कदम यांचे आजपासून उपोषण सुरु

माजी आमदार अनिल कदम यांचे आजपासून उपोषण सुरु

नाशिक। प्रतिनिधी Nashik

निफाड (Niphad) तालुक्यात सहकार विभागाने राजकीय दबावाखाली राजकीय मतांच्या फायद्यासाठी शासकीय नियम धाब्यावर बसवून नोंदणी केलेल्या 10 नवीन विविध कार्यकारी सोसायट्यांची नोंदणी रद्द करावी व त्या सोसायट्यांना नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने (NDCC) केलेले बेकायदेशीर कर्जवाटपात दोषी असणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी आज सकाळी 10 वाजेपासून येथील विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर माजी आमदार अनिल कदम हे शिवसैनिकांसह साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे….

- Advertisement -

यावेळी शिवसेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात सुरू असलेल्या सोसायटी निवडणुकीमध्ये स्थानिक राजकीय दबावाखाली पात्र असलेल्या सभासदांना डावलण्यात आले असून जुन्या संस्थेतही सभासद असणार्‍या अपात्र सभासदांना मात्र निवडणुकीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे.

निफाड तालुक्यात (Niphad Taluka) सहकार विभागाच्या यंत्रणेचा सर्रास दुरुपयोग केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी याबाबत अनिल कदम (Anil Kadam) यांच्या तक्रारीची दखल घेवून सखोल चौकशीचे निर्देश देवूनही

सहकार विभागाने अद्यापही संबंधितांवर कुठलीही कार्यवाही न केल्यामुळे बेकायदेशीर कर्ज वाटप करणार्‍या अधिकार्‍यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी व सहकार विभागाच्या मनमानी कारभाराला चाप लावावा या मागणीसाठी माजी आमदार अनिल कदम तालुक्यातील शिवसैनिकांसमवेत साखळी उपोषणास बसले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या