Thursday, April 25, 2024
Homeनाशिक'ईव्हीएम'प्रकरणी नाशकात दोघांवर गुन्हे

‘ईव्हीएम’प्रकरणी नाशकात दोघांवर गुन्हे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचे (EVM VVPAT machine) सीसीटीव्ही (CCTV) रेकॉर्डिंग निर्देशानुसार न ठेवता व वेळोवेळी निर्देश देऊनही सादर न केल्याने दोन जणांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड औद्योगिक वसाहतीतील (Ambad MIDC) केंद्रीय वखार महामंडळ गोदाम याठिकाणी ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन ठेवण्यात आले होते. 27 फेब्रुवारी 2019 ते 11 मार्च 2022 दरम्यानच्या काळातील सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग निर्देशानुसार न ठेवता व त्यासंदर्भात वेळोवेळी निर्देश करूनही ते सादर केले नाही.

तसेच भारत सरकारच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचे साहित्य सांभाळण्यास निष्काळजीपणा करून शासनास (Government) सादर न करता शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अजय दिवाकर आहिरे (Ajay Ahire) (54, निवडणूक नायब तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मीना सारंगधर (Meena Sarangdhar) (40) व अक्षय सारंगधर (Akshay Sarangdhar) यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पुढील तपास वपोनी साजन सोनवणे (Sajan Sonawane) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी गौतम सुरवाडे (Gautam Surwade) करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या