Friday, April 26, 2024
Homeजळगावचिन्याच्या मृत्यू प्रकरणात आठ जणांची साक्ष

चिन्याच्या मृत्यू प्रकरणात आठ जणांची साक्ष

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्हा कारागृहातील बंदी चिन्या ऊर्फ रविंद्र जगताप यांच्या मृत्यू प्रकरणी न्यायाधीश डी.बी.साठे यांच्या न्यायालयात गुरुवारी आठ जणांची साक्ष नोंदविण्यात आली आहे.

- Advertisement -

जळगाव जिल्हा कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड, जितेंद्र माळी यांच्यासह संबंधित दोषींवर खुनाचा व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चिन्याची पत्नी मीना जगताप हिने केली आहे.

या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मनोज जाधव व सचिन कोरके व कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची साक्ष नोंदविल्यानंतर गुरुवारी जळगाव जिल्हा कारागृहातून वर्ग झालेले जालना कारागृहातील बंदी राज चव्हाण, तसलीम काल्यासह जळगाव कारागृहातील कंपाऊंडर व पाच रक्षकांची साक्ष आज जिल्हा व सत्र न्यायालयातील न्या. डी.बी.साठे यांच्या न्यायालयात नोंदविण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या