Wednesday, April 24, 2024
Homeनगरइथिलीन गॅसचा फळांशी संपर्क वाढवून पिकण्याची प्रक्रिया शेतकर्‍यांसाठी फायदेशीर

इथिलीन गॅसचा फळांशी संपर्क वाढवून पिकण्याची प्रक्रिया शेतकर्‍यांसाठी फायदेशीर

रायपनींग चेंबर्स हे छोट्या शेतकर्‍यांसाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसतात. इयरेल किंवा इथेफॉनमधून बाहेर पडलेल्या इथिलीन गॅसचा फळांशी संपर्क वाढवून पिकण्याची प्रक्रिया वाढविण्यासाठी भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था बेंगलूरु येथे विकसित केली गेली. ही एक सोपी, वापरण्यास सुलभ आणि कमी खर्चाची पद्धत आहे.

कमी खर्चात पिकविण्याचे तंत्रज्ञान परिपक्व हिरव्या अवस्थेतील काढणी केलेल्या फळाची नैसर्गिक पिकवण करणे ही एक अत्यंत हळूवार प्रक्रिया आहे. यामुळे फळांच्या वजनात घट होणे, फळांची साल सुरकुतणे व फळांची असमान अशी विसंगत पिकवण होणे असे प्रकार जास्त होतात. फळांच्या पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर एफएसएसएआयद्वारे पूर्णपणे प्रतिबंधित केलेला आहे. आधुनिक पिकवणीसाठी रायपनींग चेंबर्समध्ये इथिलीन गॅस व्यावसायिक तत्वावर वापरली जाते. अशी रायपनींग चेंबर्स हे छोट्या शेतकर्‍यांसाठी आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसतात.

- Advertisement -

इयरेल किंवा इथेफॉनमधून बाहेर पडलेल्या इथिलीन गॅसचा फळांशी संपर्क वाढवून पिकण्याची प्रक्रिया वाढविण्यासाठी भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था बेंगलूरु (आयआयएचआर) येथे विकसित केली गेली व कृषि विज्ञान केंद्र बाभळेश्वर यांनी शेतकर्‍यांसाठी प्रसारित केली आहे. इथिलीन गॅस सोडण्यासाठी अल्प प्रमाणात सोडीयम हायड्रॉक्साइड क्षार द्रवरूपी इथ्रेलमध्ये मिसळला जातो आणि फळांना हवाबंद असलेल्या पोर्टेबल प्लास्टिक तंबू किंवा हवाबंद खोल्यांमध्ये या मुक्त इथीलिन वायूचा वापर विविध फळांच्या पिकवणी साठी केला जातो. वायूरूपी इथीलिनचा संपर्क फळांशी होवून पिकवण प्रक्रिया पूर्ण केली जाते व त्यामुळे कोणत्याही स्वरुपाचा रसायनांचा शोषण फळांमधे होत नसल्यामुळे ही सर्वात सुरक्षित पद्धत आहे.

फळांना हवेशीर प्लास्टिकच्या क्रेटमध्ये ठेवा आणि त्यांना हवाबंद प्लास्टिकच्या तंबू/चेंबर/खोलीत ठेवा आवश्यकतेनुसार इथेलची मात्रा (प्रत्येक 1 घनमीटर घनत्वासाठी 2 मि.ली.) पसरट तोंड असलेल्या पात्रामध्ये घ्या.

इथिलीन वायू चेंबरमध्ये सोडण्यासाठी काटेकोर प्रमाणात सोडियम हायड्रॉक्साईड (कॉस्टिक सोडा) (0.25 ग्रॅम प्रति 1 मिली इथ्रेलसाठी) इथ्रेलमध्ये मिसळा आणि तंबूची हवाबंद होण्यासाठी त्वरित सीलबंद करा. आवश्यक असल्यास तंबू/चेंबर मध्ये सोडली गेलेली इथिलीन गॅसच्या एकसारख्या अभिसरणांसाठी तंबू/खोलीत एक छोटी स्वयंचलित बॅटरीवर चालणारा पंखा चालू करून ठेवावा.

फळांचा इथीलिन वायूशी संपर्क 18-24 तासांपर्यंत ठेवावा व नंतर तंबू उघडा आणि पिकण्याच्या प्रक्रियेस पूर्ण करण्यासाठी क्रेट्स सभोवतालच्या तपमान किंवा 20-24 डिग्री सेल्सियस पर्यंत कमी तापमानात ठेवावा. टीप: तंबू / खोलीच्या आकाराच्या अंदाजे 70% पर्यंत जागा ही फळांच्या क्रेट्स ने भरली पाहिजे. वरील प्रमाणात इयरेल 39% शुद्धतेचा आहे जे बाजारात सहजरित्या कृषि सेवा केंद्रामधे उपलब्ध आहे.

अशाप्रकारे रायपनींग चेंबरमधुन काढलेली आंबा फळे 5 दिवसांत सामान्य तपमानावर पिकतात. त्याचप्रमाणे केळीची घडं खोलीच्या तापमानात 4 दिवसात आणि 20 डिग्री सेल्सिअस तापमानात 6 दिवसात पिकविले जाऊ शकतात. पपई आणि चिकू पिकण्यासाठी इथेलचे प्रमाण आंबा आणि केळीसाठी वापरल्या जाणार्‍या प्रमाणापेक्षा अर्ध्या भागापर्यत कमी करावा.

रायपनिंग चेंबर किंवा तंबूचा आकार आणि क्षमता :

1 घन मीटर (1 मीटर 1 मीटर 1 मी) आकारातील तंबूमध्ये 200 250 किलो आंबा बसू शकतो 4 घन मीटर (1.6 मीटर 1.4 मीटर 1.8 उंची) आकारातील तंबूमध्ये 1 टन आंबा बसू शकतो.

सामान्यपणे आंबा उत्पादक शेतक-याला 30 ते 40 रु/किलो या प्रमाणे कैरी व्यापा-याला विकावी किंवा बाजार समिती मधे विकावी लागते. हीच आंबा फळे. अशा कमी खर्चातील रायपनींग चैंबर मधे पिकवून विक्री केली तर आजच्या लॉकडाउन च्या काळात शेतावरच पिकविलेली आंबे थेट ग्राहकास विक्री करून 120 ते 130 रु/किलो या भावाने दुप्पटी पेक्षा अधिक लाभ मिळविता येणे शक्य आहे.

– डॉ. पुरुषोत्तम हेंद्रे

कृषि विज्ञान केंद्र बाभळेश्वर, उद्यान विद्या विभाग प्रमुख.

- Advertisment -

ताज्या बातम्या