…तर आस्थापनांमध्ये होणार आरटीपीसीआर

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महानगरपालिका करोना दक्षता पथकांच्यावतीने (Municipal Corporation Corona Dakshata Squad) बाजारपेठेतील आस्थापनांमध्ये लस (Vaccination) घेणार्‍यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. ज्या खासगी आस्थापनांनी लसीकरण (Vaccination by Private Establishments) केले नाही त्यांनी त्वरित लसीकरण (Vaccination) करावे. लसीकरण केले नसलेल्या आस्थापनांमध्ये आरटीपीसीआर चाचण्या (RTPCR Testing) करण्यात येणार आहेत. आयुक्त शंकर गोरे (Commissioner Shankar Gore), उपायुक्त यशवंत डांगे, करोना दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी शशिकांत नजान (Shashikant Najan) यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी तपासणी करण्यात आली.

अहमदनगर शहरातील कापड बाजार (Kapad Bazar), दाळमंडई (Dalmandai), आडतेबाजार (Adatebazar), सराफ बाजार (Saraf Bazar), नवीपेठ, सर्जेपुरा भागात करोना नियमावली संदर्भात व्यापारी, दुकानदार, खाजगी आस्थापना यांना सूचना देऊन लसीकरण (Vaccination) प्रमाणपत्राची तपासणी केली. ज्या खासगी आस्थापणांनी लसीकरण केले नाही त्यांनी त्वरित लसीकरण करावे अन्यथा उद्या (मंगळवार) पासून लसीकरण केले नसलेल्या आस्थापना मध्ये आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येतील अशी सूचना देण्यात आली. यावेळी विनामास्क आढळून आलेल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी नजान यांच्यासह दक्षता पथकातील, नंदकुमार नेमाणे, राहुल साबळे, राजेंद्र बोरुडे, अमोल लहारे, भास्कर आकुबत्तीन, विष्णू देशमुख, राजू जाधव, राजेश आनंद, दीपक सोनवणे, गणेश वरुटे, रिजवान शेख, अमित मिसाळ, नंदकुमार रोहकले, भीमराज कांगुडे, गणेश धाडगे, भाऊ भाकरे, अनिल कोकणे उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *