Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रयंत्राने ऊस तोडणी केल्यास वजावट करावयाचे पाचटाचे वजन निश्चित करण्यासाठी अभ्यास गटाची...

यंत्राने ऊस तोडणी केल्यास वजावट करावयाचे पाचटाचे वजन निश्चित करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना

नेवासा l तालुका प्रतिनिधी l Newasa

ऊस तोडणी यंत्राने ऊस तोडणी केल्यास वजावट करावयाचे पाचटाचे वजन निश्चित करण्यासाठी

- Advertisement -

पाडेगाव मध्यवर्ती ऊस ऊस संशोधन केंद्राचे शास्रज्ञ डॉ. सुभाष घोडके यांचे अध्यक्षतेखाली १४ सदस्यीय अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली आहे. या अभ्यास गटात नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील गंगामाई इंडस्ट्रीजचे मुख्य शेतकी अधिकारी रमेश कचरे व कर्जत तालुक्यातील अंबालिका शुगरचे सरव्यवस्थापक मानसिंग तावरे यांचा समावेश आहे. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी या अभ्यास गटाची स्थापनेचा आदेश काढला आहे.

ऊस नियंत्रण आदेश १९६६ मधील कलम (३) (३A) (III) मधील तरतुदीनूसार जास्तीत जास्त १ क्विंटल ऊसामागे १ किलो (1 %) पाचट वजावट ग्राह्य धरण्याची तरतुद आहे. साखर आयुक्त कार्यालयाने दि. २७ जानेवारी २०२१ रोजीचे पत्राने मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव व वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, मुंबई, विस्मा (WISMA) पुणे, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोशिएशन,पुणे यांना ऊस तोडणी यंत्राने ऊस तोडणी केल्यास जास्त पाचट येते व त्याचे वजावटीचे प्रमाण निश्चित करून मिळणे करिता कळविले होते. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव व वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट यांच्याशी सल्ला मसलत करुन या विषयाचा अभ्यास करण्यासाठी खालीलप्रमाणे अभ्यास गट स्थापन करण्यात आली आहे .

१) डॉ. सुभाष घोडके,शास्त्रज्ञ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव(अध्यक्ष)

२) प्रा.पी.पी.शिंदे, शास्त्रज्ञ, वसंतदादा शुगर इंस्टीटयुट मांजरी, पुणे(सदस्य)

३) श्री.रामचंद्र धीरेंद्रराव माहुली, कार्यकारी संचालक, राजारामबापू सहकारी साखर कारखाना लि. ता. वाळवा, जि.सांगली (सदस्य)

४) श्री.मनोहर जोशी, कार्यकारी संचालक, जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. हुपरी (सदस्य)

५) श्री.अ.बा.पाटील, कार्यकारी संचालक, सहयाद्री सहकारी साखर कारखाना लि. कराड जि. सातारा (सदस्य)

६) श्री.मानसिंग तावरे, जनरल मॅनेजर, अंबालिका शुगर प्रा.लि.अंबिकानगर ता. कर्जत जि. अहमदनगर (सदस्य)

७) श्री.यशवंत कुलकर्णी, कार्यकारी संचालक, श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि. श्रीपुर(सदस्य)

८) श्री.संजीव माने, कृषी भुषण शेतकरी मु.पो.आष्टा ता. वाळवा (सदस्य)

९) श्री.पांडुरंग आवाड, कृषी भुषण शेतकरी, मु.पो. आवाड शिरपुर,ता. कंळब (सदस्य)

१०) श्री.रमेश कचरे, मुख्य शेती अधिकारी, गंगामाई इंडस्ट्रीज अॅन्ड कंन्स्ट्रशन्स,लि. ता. हरिनगर ता.शेवगाव (सदस्य)

११) श्री.संजय खताळ, महारष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि . मुंबई(सदस्य)

१२) श्री.अजित चौगुले, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशन, पुणे(सदस्य)

१३) श्री. एस. एस. गंगावती, डेक्कन शुगर टेकनोलोजी असोशिएशन, पुणे (सदस्य)

१४) श्री.पांडुरंग शेळके,सहसंचालक (विकास),साखर आयुक्तालय,पुणे(सदस्य सचिव )

मजुरांनी तोडणी केलेल्या ऊसाच्या वजनातून मोळी बांधणी (बायडिंग मटेरियल) वजा करावयाची सवलत…

साखर कारखाने शेतकऱ्यांच्या ऊसाच्या वजनातुन मोळी बांधणी करिता वापरलेल्या सामुग्रीचे वजन वजावट करतात याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी साखर आयुक्त कार्यालयाकडे येत असल्याने साखर आयुक्तांनी याबाबत दि.२७ जानेवारी २०२१ रोजी परिपत्रक काढून साखर कारखान्याना निर्देश दिलेले आहेत. मोळी बांधणी करुन कारखान्यास ऊस पुरवठा झाला असेल तर मोळी बांधणी करिता वापरलेल्या सामुग्रीचे वजन जास्तीत जास्त एक क्विंटल ऊसामागे १ किलो (१ %) वजावट केंद्र शासन किंवा राज्य शासन किंवा साखर (आयुक्त) यांचे मान्यतेने करावयाची तरतुद आहे. अशी कायदेशीर तरतूद असताना साखर कारखाने मोळी बांधणी करिता वापरलेल्या सामग्रीचे १ % पेक्षा जास्त वजन ऊसाच्या वजनातून घट करतात अशी तक्रार करण्यात आलेली आहे. ही बाब विचारात घेता, मोळी बांधणी वापरलेल्या सामग्रीचे वजन ऊसाच्या वजनातून घट करताना ऊस नियंत्रण आदेश १९६६ मधील कलम (३) (३A ) (iii) नुसार कार्यवाही करावी असे निर्देश साखर आयुक्तांनी दिलेले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या