Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रअत्यावश्यक वाहन परवाना चिकटून हातभट्टीच्या दारुची वाहतूक

अत्यावश्यक वाहन परवाना चिकटून हातभट्टीच्या दारुची वाहतूक

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – लॉकडाऊनमुळे अनेक विचित्र घटना समोर येत आहेत. पुण्यात सोमवारी मृत मनपा कर्मचार्‍याचे कपडे घालून गांजा आणणार्‍या गंजाड्यांना पोलिसांनी अटक केल्याची घटना ताजी असतानाच त्यानंतर असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात पुन्हा आढळून आला आहे. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक वाहन परवाना चिकटून हातभट्टीच्या दारुची वाहतूक करणार्‍यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.

- Advertisement -

या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागानं हातभट्टीचा छोटा कारखानाच उध्वस्त केला. दोन जेसीबीच्या सहाय्याने हा कारखाना जमीनदोस्त करण्यात आला. या कारवाईत 9 दारू उत्पादक विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे. दोन पिकप वाहनांसह पावणे सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पिकप वाहन कांतीलाल राठोड या व्यक्तीच्या नावावर आहेत. हवेली तालुक्यातल्या सोरपतवाडीत सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी कारवाई करण्यात आली.. सोरपतवाडीत वाडीत हातभट्टी दारूचा छोटा कारखानाच उभारला होता. आठ ते दहा कढईत दारूचं रसायन आणि दारूनिर्मिती सुरू होती. उंचावरील टाकी ही 20 हजार लिटरची तर खाली दहा हजार लिटरच्या आठ टाक्या होत्या.

पुणे जिल्ह्यातील 25 टक्के दारूचा इथून पुरवठा होत होता. दोन जेसीबीच्या मदतीने हा हातभट्टीचा कारखानाा उध्वस्त केलाय. धरणाला गळती लागल्यानंतर ज्या प्रमाणे धबधबा वाहतो. अगदी तशाच स्वरूपात दारू टाक्यातून पडत होती. दारूच्या लोटच्या लोट पाटातून वाहू लागले. या कारवाईत तब्बल 42 हजार लिटर हातभट्टीचा रसायन आणि तीन हजार हातभट्टी दारू नष्ट केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या