Wednesday, April 24, 2024
Homeनगरअत्यावश्यक सेवा देणार्‍यांना लसीकरण बंधनकारक

अत्यावश्यक सेवा देणार्‍यांना लसीकरण बंधनकारक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील अत्यावश्यक सेवा देणार्‍यांना करोना प्रतिबंधक लसीकरण बंधनकारक असल्याची माहिती श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिली आहे.

- Advertisement -

लसीकरण न झालेल्या कामगारांना 15 दिवसांची वैधता असलेले आरटीपीसीआर या करोना चाचणीचे प्रमाणपत्र जवळ बागळणे अनिवार्य आहे. ही चाचणी ज्याने त्याने स्वतः करून घ्यायची आहे. यासंदर्भात शहरातील 400 ते 500 दुकानदारांना पत्र पाठविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, शहरातील अत्यावश्यक सेवा देणार्‍या सर्व संस्था, कार्यालये, हॉटेल, दुकानांसह खासगी आस्थापना, खासगी वाहनचालक व वाहतुकीशी संबंधीत अन्य कर्मचारी, दहावी, बारावीच्या परीक्षेशी संबंधित शिक्षक, कर्मचारी, बांधकाम कर्मचारी, वृत्तपत्र वितरक, मंगल कार्यालयातील कर्मचारी, उत्पादन क्षेत्रातील सर्व कर्मचार्‍यांना करोना लसीकरण करण्याचे बंधनकारक केले आहे.

लसीकरण न झालेले कामगारांना 15 दिवसांची वैधता असलेले आरटीपीसीआर या करोना चाचणीचे प्रमाणपत्र जवळ बागळणे अनिवार्य आहे. या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या निर्णयाची येत्या 10 एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या