Friday, April 26, 2024
Homeजळगावदिड लाखांची लाच घेतांना कार्यालयीन अधीक्षकाला रंगेहाथ पकडले

दिड लाखांची लाच घेतांना कार्यालयीन अधीक्षकाला रंगेहाथ पकडले

एरंडोल – Erandol – प्रतिनिधी :

येथील सील केलेले गाळे ताब्यात देवून त्याचे नूतनीकरण करण्याच्या मोबदल्यात दिड लाखांची लाच मागणाऱ्या एरंडोल पालिकेतील लाचखोर कार्यालय अधीक्षक संजय दगडू धमाळ (वय 51 , रा . 24 , म्हाडा कॉलनी , अमळनेर , जि.जळगाव ) यास शुक्रवारी दुपारी धुळे एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच एरंडोल पालिकेच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

दरम्यान , संशयीताने एव्हढ्या मोठ्या प्रमाणावरील लाच कुणाच्या सांगितल्यावरून मागितली याचा उलगडा एसीबीच्या सखोल चौकशीत होणार आहे.

या प्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात शुक्रवारी राञी उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

एरंडोल पो.स्टे. सूञांनी दिलेली माहीती अशी की, शहरातील 51 वर्षीय तक्रार दाराने धुळे एसीबीकडे या संदर्भात दि. 12 मार्च २०२१ रोजी तक्रार नोंदवली होती.

आरोपी पालिका कार्यालय अधीक्षक संजय दगडू धमाळ यांनी तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या नगरपालिका दुकान संकुलातील करार संपल्याने सील केलेले गाळे लिलावामध्ये ताब्यात देऊन तसेच तक्रारदार यांच्या इतर गाळ्यांना नोटीस न देण्यासाठी दि. 12 मार्च रोजी दोन लाखांची लाच मागितली मात्र दिड लाखात तडजोड झाली.

एसीबीने सापळा रचल्यानंतर आरोपीने शुक्रवारी दुपारी दिड लाखांची लाच पालिकेत स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. यानंतर पालिकेत मोठी खळबळ उडाली व पालिकेतील मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या सह कार्यालयातील ईतर कर्मचार्यांनी सुध्दा कार्यालय सोडून अक्षरश: पळ काढला.

त्याठिकाणी ए. सी. बी च्या पथकाला पुराव्यादाखल पैशांचे आकडे लिहीलेली चिठ्ठी मिळून आली. त्या अनुषंगाने अधिकार्यांनी दिलेल्या माहीतीनुसार संशयीत म्हणून मुख्याधिकारी यांची तपासणी होणार असल्याचे सांगीतले, दरम्यान फिर्यादीने फिर्याद देतांना मुख्याधिकारी किरण देशमुख व कार्यालयीन अधीक्षक संजय ढमाळ यांनी लाचेची मागणी केली असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

ए. सी. बी च्या पथकाने दि. १२ रोजी सकाळी १०वाजेपासून सापळा रचण्याचे काम सुरू केले होते. यात त्यांनी दुचाकी व जुने चारचाकी वाहन यांचा वापर केला व अगदी शिताफिने व नियोजनबध्द पध्दतीने दुपारी ४वाजेच्या सुमारास कारवाई केली.

हा सापळा नाशिक येथील ला.प्र.वि.येथील अधिक्षक अपर पोलिस अधिक्षक निलेश सोनवणें,ला.प्र.वि.नाशिक चे पोलिस उपअधिक्षक तथा वाचक विजय जाधव,धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण व प्रकाश झोडगे, सुधीर सोनवणे,संतोष हिरे,कृष्णकांत वाडीले , प्रशांत चौधरी,राजन कदम,सुधीर मोरे यांच्या पथकाने यशस्वी केला .

- Advertisment -

ताज्या बातम्या