Friday, April 26, 2024
Homeनाशिकछ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ही राजपुरकरांची इच्छा!

छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ही राजपुरकरांची इच्छा!

येवला l Yeola (प्रतिनिधी)

तालुक्यातील राजापूर येथील चौफुलीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा, ही तर राजपुरकरांची इच्छा आहे. प्रशासनाने पाठपुरावा करून त्वरित पुतळा उभारण्यास परवानगी द्यावी अशी मागणी सकल शिवभक्तांनी आज नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगळे यांचेकडे निवेदनाद्वारे केली.

- Advertisement -

राजापूर येथे चौफुलीवर अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणून बसविल्यानंतर राजापूरकरांमध्ये औत्सुक्य निर्माण झाले होते. ही बाब समजताच अधिकाऱ्यांनी धाव घेत संभाव्य तणाव टाळण्यासाठी हा पुतळा सुरक्षित स्थळी हलविला.

दरम्यान, सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. येवला नांदगाव मार्गावरील येवला तालुक्यातील राजापूर येथील वर्दळीचा असलेल्या चौफुलीच्या रस्त्याच्या कडेला लोखंडी चबुतऱ्यावर तयार करून आणलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मध्यरात्री ठेवण्यात आला होता. हा प्रकार शनिवारी दिनांक २१ सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच एकच खळबळ उडाली होती.

येथे पुतळा बसविण्या संदर्भात कुठलीही चर्चा किंवा नियोजन नसताना, अचानक पुतळा कोणी बसविला, याबाबत सर्वांनाच प्रश्न पडला. मात्र आता हा पुतळा त्या चौफुलीवर उभारावा अशी मागणी सकल शिवभक्तांनी निवेदनाद्वारे केली आहे. या पुतळ्याची उंची जास्त असल्याने कुठल्याही कंपाउंडमध्ये आणि गेटमधून पुतळा आत जात नव्हता.

त्यामुळे हा पुतळा येवले येथील महात्मा फुले नाट्यगृहाच्या आवारात ठेवण्यात आला आहे. निवेदनावर संजय सोमासे, सुदाम पडवळ, आदित्य नाईक, सागर नाईकवाडे, डॉ.नंदकिशोर शिंदे, सुधाकर पाटोळे, आनंद शिंदे, संतोष काटे, मयुर मेघराज, संतोष केंद्रे, मच्छिंद्र हडोळे, छगन दिवटे, रोहिदास जाधव, युवराज पाटोळे, कुष्णा राठोड, अमोल पाबळे, लखन पाटोळे, नितीन सारवान, लखन परदेशी, बाळु थळकर, गोरख कोटमे, गणेश पाटोळे, शामराव राजवाडे, चेतन कासार, योगेश हिवाळे, विलास ढोमसे, भरत पुरकर, रामनाथ ढोमसे, प्रविण बोळीज, नाना महाले, निंबाजी फरताळे आदींच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या