Thursday, April 25, 2024
Homeनगरईपीएस-95 पेन्शनधारकांच्या विविध मागण्यांसाठी नगर येथे गुरुवारी धरणे आंदोलन

ईपीएस-95 पेन्शनधारकांच्या विविध मागण्यांसाठी नगर येथे गुरुवारी धरणे आंदोलन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

गेल्या 10 ते 12 वर्षापासून ईपीएस-95 पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ व्हावी म्हणून पेन्शनर संघटना सतत आंदोलन करीत आहे. पण अद्यापही पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ झाली नाही. ईपीएस-95 पेन्शनधारकांना किमान 9000 रुपये पेन्शन व महागाई भत्ता मिळावा म्हणून सहाय्यक आयुक्त भविष्य निधी कार्यालय, अहमदनगर येथे गुरुवार दि 25 ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात येेणार आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी व केंद्रीय कामगार मंत्री भुपेंद्र यादव यांनाही वेळोवेळी निवेदन दिलेले आहे. तत्कालिन कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांचे उपस्थितीत शिर्डी येथे मेळावा घेण्यात आला होता. तसेच कोशीयारी कमिटीचा अहवाल येऊनही पेन्शनवाढ झालेली नाही. पेन्शनवाढ मिळावी म्हणून काही संघटनांनी मा. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या आहेत. त्याचा निकाल अद्यापही झालेला नाही.

ईपीएस-95 पेन्शनधारकांना किमान रु. 9000/- पेन्शन व महागाई भत्ता मिळावा म्हणून देश पातळीवरील 5 संघटना एकत्र आलेल्या आहेत. त्यांची नांदेड येथे बैठक झाली. सदर बैठकीत 5 संघटना एकत्र येऊन कृती समिती स्थापन करण्यात आली असून या कृती समितीच्यावतीने सहाय्यक आयुक्त, भविष्य निधी कार्यालयासमोर अहमदनगर येथे व नंतर दिल्ली येथे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबाबतचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव व अर्थमंत्री निर्मला सितारमन यांना मा. सहाय्यक आयुक्त, भविष्य निधी याचे मार्फत देण्यात येणार आहे.

तरी सर्व पेन्शनधारकांनी गुरुवार दि. 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11.00 वा. मा. सहाय्यक आयुक्त, भविष्य निधी कार्यालय, आकाशवाणी केंद्राजवळ, अहमदनगर येथे होणार्‍या धरणे आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन ईपीएस-95 पेन्शनधारक कृती समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या