Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedभेंडवड घटमांडणीचे भाकित ; देशावर महामारी आणि आर्थिक संकट!

भेंडवड घटमांडणीचे भाकित ; देशावर महामारी आणि आर्थिक संकट!

दिपक सुरोसे

शेगाव : Shegaon

- Advertisement -

बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळ येथे काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घटमांडणी करीत आज भाकित वर्तविले आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत ३५० वर्षाची भेंडवळ भविष्यवाणीची परंपरा अखंडित ठेवली आहे. देशासह राज्यातील पाऊस, शेती आणि देशातील विविध विषयांवर अंदाज वर्तवणाऱ्या भेंडवळची भविष्यवाणी आज जाहीर झाली.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे पीक-पाणी, पाऊसमान याबाबतचा अंदाज वर्तवला जातो. यंदा मात्र लॉकडाऊनमुळे ही घरातच घटमांडणी करून त्यातून झालेल्या हालचालीवरूर्न भविष्यवाणी जाहीर करण्यात आली.

भेंडवळच्या घटमांडणीतील भाकित

पाऊस : जून महिन्यात पाऊस कमी असेल, जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल, ऑगस्टमध्ये कमी अधिक पाऊस होईल, सप्टेंबर महिन्यात कमी पाऊस होईल.

अवकाळी पावसाचा प्रमाण या वेळेस कमी असणार आहे

यावर्षी चारही महिन्यात पावसाळा साधारण असून पीक परिस्थिती साधारण असले.

पीक : ज्वारी, तूर, गहू, कपाशी, सोयाबीन सर्व पीकं सर्वसाधारण येतील, पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे. पहिल्याच महिन्यात पीक पेरणी केली जाईल, चारा टंचाई भासेल.

नैसर्गिक आपत्ती – पृथ्वीवर नैसर्गिक आणि कृत्रीम आपत्तीसुद्धा येऊ शकते, रोगराईचे संकट येईल, त्यामुळे देशातील आर्थिक स्थिती सुद्धा कमकुवत होईल.

राजा कायम : राजा कायम आहे मात्र आर्थिक स्थिती खालावू शकते आणि जगावर आर्थिक संकट येईल. राजावरील ताण वाढेल, शिवाय संरक्षण खात्यावरही ताण येईल, परकीयांची घुसखोरी वाढेल.

1) पीक पाणी साधारण,

2) राजा कायम, मात्र ताण-तणा

3) पीक साधारण चारा टंचाई

4) पृथ्वीवरील संकट कायम

३५० वर्षांपासूनची पावसाचे भाकीत वर्तवणारी परंपरा : अक्षय्य तृतीयेस होणार भेंडवळची मांडणी

त्यानुसार यावर्षी पाऊस हा सर्वसाधारण राहणार असून देशावर, महामारी आणि आर्थिक संकट येणार आहे. गेल्या ३५० वर्षांपासून भेंडवळ येथे भविष्यवाणी वर्तवण्यात येते. यंदा लॉकडाऊनमुळे ही परंपरा खंडीत होऊ नये म्हणून केवळ चंद्रभान महाराज यांच्या वंशजांसह पाच लोकांनी अक्षय तृतीयेला सायंकाळी भेंडवळ येथे घट मांडणी केली आणि आज सकाळी सूर्योदयापूर्वी त्या घट मांडणीचे निरीक्षण करत त्यानुसार या वर्षीचे भाकीत वर्तविले. त्यानुसार यंदा राज्यात साधारण पाऊस पडेल. तर शेतीचे पीकही साधारण राहील.

देशात नैसर्गिक आपत्ती ओढावेल, देशाचा राजा कायम राहील, अशी भविष्यवाणी यावेळी वर्तविण्यात आली. देशाची आर्थिक स्थिती याही पेक्षा कमकुवत होण्याचा अंदाजही या भविष्यवाणीत वर्तवण्यात आला आहे. तर पावसाबाबत जून महिन्यात पाऊस साधारण पडेल. जुलै महिन्यातील पर्जन्यमान चांगले असेल. तर ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कम असेल. सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी राहणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भेंडवळची घटमांडणी उपस्थिती माध्यमांवर जाहीर करण्यात येईल अशी अशा घोषणेनंतर आज सारंगधर महाराज यांनी ही घोषणा केली मात्र संपूर्ण देश कोरोनाचे संकट झेलत असताना हे महामारी संकट आणखी गडद होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं चिंतेत वाढ झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या