Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशनोकरदारांसाठी आनंदाची बातमी! EPFO ने व्याजदरासंदर्भात घेतला महत्वाचा निर्णय

नोकरदारांसाठी आनंदाची बातमी! EPFO ने व्याजदरासंदर्भात घेतला महत्वाचा निर्णय

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

आयटीआरनंतर वित्त मंत्रालयाने कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. यामुळे देशातील करोडो नोकरदार वर्गाला फायदा होणार आहे. अर्थ मंत्रालयाकडून नोकरदार वर्गाच्या भविष्य निर्वाह निधी योगदानावर(EPFO) ८.१५% व्याजदर देण्याचे निर्देश देण्यात आला आहे. ३१ जुलैपूर्वी आलेल्या बातमीने नोकरदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

- Advertisement -

ईपीएफओने जारी केलेल्या एका नोटिफिकेशनमध्ये म्हणण्यात आले आहे की, भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने ईपीएफ योजनेतील प्रत्येक सदस्याच्या खात्यात २०२२-२३ वर्षासाठीचे व्याज जमा करण्यासाठी कर्मचारी भविष्य निधी योजना, १९५२ च्या पॅरा ६० (१) अंतर्गत केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) PF वरील व्याजदर वाढवण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता.

Gujarat Rain : गुजरातमध्ये पावसाचा कहर! जुनागड येथे इमारत कोसळली, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

CBT ही ईपीएफओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे आणि केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव याचे अध्यक्ष आहेत. EPF व्याजदरात वाढ झाल्यामुळे सुमारे 6 कोटी सक्रिय ग्राहकांना फायदा होणार असून यापैकी ७२.७३ लाख नोकरदार हे आर्थिक वर्ष २०२२ मध्ये पेन्शनधारक होते.

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशाचा मुद्दा अधिवेशनात गाजला; देवेंद्र फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका

साधारणपणे, व्याज दर आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वित्त मंत्रालयाद्वारे अधिसूचित केले जातात. ग्राहक आर्थिक वर्षे २०२३ च्या अधिसूचनेची वाट पाहत होते. १९७७-७८ मध्ये पीएफ ठेवींवर सर्वात कमी व्याजदर ८% होता. सदस्यांना EPF कॉंट्रीब्युशनवर जास्त व्याजदराची अपेक्षा आहे. आर्थिक वर्षे २०२३ साठी, EPFO ​​ला ९०,४९७.५७ कोटी रुपये मिळण्याचा अंदाज आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

ईपीएफओकडून यंदा व्याज दरवाढ ही अपेक्षित होती. कमाईच्या बाबतीत EPFO संघटनेसाठी मागील वर्ष खूप चांगले होते. ईपीएफओचे उत्पन्न वाढले असून EPFO तुमचा निधी अनेक ठिकाणी गुंतवते जिथून त्याला परतावा मिळतो. आणि याच गुंतवणुकीद्वारे संघटनेच्या सदस्यांना जमा पीएफवर व्याज मिळते. यावेळी व्याजदर वाढवण्यामागे अनेक कारणे दिली जात होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या