Thursday, April 25, 2024
Homeनाशिकपर्यावरण संरक्षण सामूहिक जबाबदारी: बच्छाव

पर्यावरण संरक्षण सामूहिक जबाबदारी: बच्छाव

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

पर्यावरण (environment) समतोल राखण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात (tree Plantation) वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे काळाची गरज आहे.

- Advertisement -

पर्यावरणाचे संरक्षण (Protection of the environment) करणे आपल्या सर्वांची सामूहिक तसेच नैतिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन सहाय्यक कल्याण आयुक्त भावना बच्छाव (Assistant Welfare Commissioner Emotion Survival) यांनी केले.

नांदूरशिंगोटे (Nandurshingote) येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात जागतिक पर्यावरण दिना (World Environment Day) निमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी केंद्राचे प्रदीप सोनवणे, कामगार कल्याण मंडळाचे प्रमुख अनिल बोरसे (Anil Borse, head of Kamgar Kalyan Mandal) प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. कामगार कल्याण मंडळातर्फे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सुमारे 100 वृक्षांची लागवड करण्यात आली.

सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. बोरसे यांनी प्रास्ताविकात पर्यावरणाचे महत्व सांगून झाडे लावा, झाडे जगवा याचे पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी विजय पाटील, कविता कासार, निलेश वाघ, बाळू लांडगे यांच्यासह सेवेकरी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या