Friday, April 26, 2024
Homeनाशिकपर्यावरण संवर्धनासाठी सायकलवरून जनजागृती

पर्यावरण संवर्धनासाठी सायकलवरून जनजागृती

लासलगाव। वार्ताहर

पर्यावरण संवर्धन आणि महिला सशक्तीकरण, जनजागृती आणि महाराष्ट्रातील लोकल परिस्थितीचा अभ्यास करणे यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून यवतमाळ जिल्ह्यातील पुनवट येथील प्रणाली चिकटे ही पर्यावरण संवर्धनचा संदेश देत महाराष्ट्रभर सायकलने भ्रमंती करत आहे.

- Advertisement -

प्रणाली चिकटे या विद्यार्थीनीची सायकलवरून महाराष्ट्रभर जनजागृती सुरू आहे. गुरुवारी तिचे लासलगावला आगमन होताच येथील सायकल क्लबच्यावतीने सत्कार करण्यात आला. 21 वर्षीय प्रणाली हिने 20 ऑक्टोबर 2020 रोजी सायकल प्रवास सुरू केला असून आतापर्यंत यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, विदर्भ पूर्ण करून खान्देशातील जळगाव, अंमळनेर, सिंदखेडा, शहादा, चिखली पुर्वासन गाव, भडगाव, तोरणमाळ, नंदूरबार मार्गे मी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आदर्श गाव बारीपाडा या बारीपाडातील शाश्वत विकास समजून घेण्यासाठी तिथे 4 दिवस मुक्कामी होती. तेथून साक्री मार्गे धुळे येथे आली.

एवढ्या दिवसात 6 हजार कि. मी. चा प्रवास पूर्ण झाला असून पुढे मालेगाव मार्गे नाशिककडे मार्गक्रमण करत असताना लासलगाव येथे येऊन तिथून पुढे नाशिक, ठाणे, मुंबई मार्ग कोकणकडे प्रवास असणार आहे. आदिवासी, ग्रामीण, शहरी भागात जाणे, स्थानिक संस्था, शाळा, आणि सरकारी कार्यालयांना भेटी देऊन सांस्कृतिक, भौगोलिक, शेतीची परिस्थिती समजून घेत आहे.

लासलगाव येथे प्रणालीच्या सत्काराप्रसंगी अनिल ब्रम्हेचा, अनिल ठाकरे, संजय पाटील, संजय कदम, महेश वर्मा, विजू कुंदे, डॉ. किरण निकम, डॉ. उत्तम रायते, सागर खांबेकर आदींनी उपस्थित राहून तिच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या