Video : आदित्य ठाकरेंचा आदिवासी बहुल भागात दौरा; पाड्यांमधील पाणीप्रश्न लवकरच मार्गी निघणार

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी Nashik

येत्या तीन ते चार महिन्यात इगतपुरी (igatpuri), त्र्यंबक (Trimbakeshwar), पेठ (peth) आणि सुरगाणा (Surgana) परिसरातील आदिवासी बहुल पाड्यांवरील (Tribal area) पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे (environment minister aditya thakeray) यांनी केले….

खरशेत (kharshet), सावरपाडा (Sawarpada) परिसरातील आदिवासी बहुल भागात दौऱ्याप्रसंगी आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे (Agriculture minister dadaji bhuse), जिल्हाध्यक्ष विजय करंजकर (Shivsena nashik president vijay karanjkar) , जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector suraj mandhare) यांच्यासह अनेक नागरिकांची उपस्थिती होती.

खरशेत येथील महिलांना शिवसेनेकडून जो पूल बांधून देण्यात आला तिथेही आदित्य ठाकरेंनी भेट दिली. तसेच येथील आदिवासींनी आदित्य ठाकरेंचे पारंपारिक पद्धतीने स्वागत केले. संबळ नृत्य, आदिवासी नृत्य सादर करत आदित्य ठाकरेंचे यावेळी लक्ष वेधले.

नागरिकांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले, येत्या तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत आदिवासी पाड्यातील पाणीप्रश्न गांभीर्याने घेऊन तो सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *