Wednesday, April 24, 2024
Homeनंदुरबारशहादा येथील उद्योजकाची 61 लाखांत फसवणूक

शहादा येथील उद्योजकाची 61 लाखांत फसवणूक

शहादा – Shahada – ता.प्र :

येथील बायोझाईन कृषि उत्पादन कंपनीकडून पपईवर प्रक्रिया केलेले पेपिन्स नावाचे चार टन प्रॉडक्ट घेवून

- Advertisement -

त्याचे पैसे परत न करता मुंबईच्या केन्या परिवाराने 61 लाख रुपयांमध्ये फसवणूक केली होती.

मात्र, सदर प्रश्न शेतकर्‍यांच्या जिव्हाळयाच्या असल्याने शहादा पोलीसांनी अवघ्या 11 दिवसात तपासचक्रे गतिमान करुन भिवंडी येथून केन्या बंधूंना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 26 लाख रुपये वसुल केले आहेत. शहादा पोलीसांच्या या कामगिरीबाबत सर्वत्र कौतूक करण्यात येत आहे.

या बाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा येथे किशोर नरोत्तम पाटील या उद्योजकाचे कृषी प्रक्रिया करणारी बायोझाईम नावाची पपईच्या चिकापासून पेपिन्स नावाचे उत्पादन करणारी कंपनी आहे.

या कंपनीची एस आय बायोझाईम वेबसाईट असून त्या माध्यमातून भिवंडी येथील बालाजी एंझाईम कंपनीच्या श्रीमती पलक अभय केन्या, अभय अरूण केन्या, अरुणकुमार केन्या यांनी ऑगस्ट 2019 पासून त्यांच्या मागणीनुसार पेपिन्सची खरेदी करण्यासह वेळोवेळी पैशांची परतफेड करीत होते.

त्यामुळे दोन्ही उद्योजकांचा एकमेकांवर विश्वास बसला. जून 2020 रोजी केण्याबंधूनी चार टन पेपिन्सची ऑर्डर देत हा माल ओस लॉजिस्टिक या कंपनीमार्फत किशोर पाटील यांनी पोहच केला. त्यानंतर पुन्हा जुलै 2020 मध्ये पाच टन पेपिन्सची ऑर्डर त्यांनी दिली.

मात्र पूर्वीचे चार टनाचे 31 लाख 14 हजार 769 रुपये दिल्यानंतरच पुढील ऑर्डर पूर्ण करणार असल्याचे पाटील यांनी त्यांना स्पष्ट केले.

परंतु संपूर्ण रक्कम आगाऊ देणार असल्याचे केन्या बंधूनी सांगितल्याने पाटील यांनी पाच टन पेपिन्स माल तयार केला.

त्यानंतर या तीनही संशयितांनी मालाची गुणवत्ता कमी असल्याचे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली आणि पूर्वीचा चार टन माल परत न करता परस्पर विक्री करून स्वतःचा आर्थिक फायदा त्यांनी केला.

सुरुवातीला कमी मागणीमध्ये माल घेऊन त्याचा वेळोवेळी परतावा करून विश्वास संपादन केल्यानंतर केन्या बंधूंनी पाटील यांची सुमारे 63 लाखाची फसवणूक केल्याचे त्यांच्या निदर्शनात आले.

तसेच पाटील यांनी ज्या शेतकर्‍यांकडून पपई विकत घेतली होती ते शेतकरीदेखील पाटील यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावत होते. त्यामुळे पाटील यांना केन्या बंधूंकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शहादा पोलिसात तक्रार दाखल केली.

पाटील यांच्या फिर्यादीवरून दि. 11 ऑक्टोंबर रोजी पोलिसांनी कलम 420, 406, 34 प्रमाणे बालाजी इंजाइम कंपनीच्या पलक केण्या, अभय केण्या व अरुण केन्या या तिघांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला होता. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्याकडे देण्यात आला.

दरम्यान, ही घटना शेतकर्‍यांशी संबंधित असल्याने शहादा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तपासचके्र गतिमान केली. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने थेट भिवंडी येथे जाऊन कारवाई करत केन्या बंधूंना ताब्यात घेतले व शहादा येथील फसवणूक झालेल्या उद्योजकाला न्याय मिळवून देताना 26 लाख रुपये वसूल करून देण्यात यश आले.

दाखल गुन्ह्यात 61 लाखाची फसवणूक असल्याचे म्हटले असले तरी प्रत्यक्षात चार टन माल केण्या बंधूंनी घेतला होता.

त्यापैकी सुरुवातीला पाच लाखाची परतफेड झाल्याने उर्वरित 26 लाख शहादा पोलीसांनी वसूल करून दिल्याने पाटील या उद्योजकाने सुटकेचा निश्वास सोडला. गुंतागुंतीचे हे प्रकरण पोलिसांनी योग्यरित्या हाताळल्याने पोलिसांच्या या कामगिरीचे शेतकर्‍यांमधून कौतूक केले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या