Thursday, April 25, 2024
Homeजळगावजळगावातील उद्योजकाची 55 लाखांत फसवणूक

जळगावातील उद्योजकाची 55 लाखांत फसवणूक

जळगाव – Jalgaon :

एका महिन्याच्या आत मालाची रक्कम देण्याचे आमिष दाखवत गुजरात राज्यातील वेगवेगळ्या दोन कंपन्यांनी सुमारे 55 लाखांची

- Advertisement -

फसवणूक केल्याप्रकरणी खान्देश मिल परिसरातील एका कंपनीच्या तक्रारीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

जळगाव एमआयडीसी भागातील रिषभ मेटल्स अ‍ॅण्ड केमिकल्स ही विविध प्रकाराची रसायने प्रक्रिया करून विक्री करणारी कंपनी आहे.

हीचे खान्देश मिल्स कॉम्प्लेक्स येथे कार्यालय आहे. काही महिन्यांपूर्वी गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील रंजनी डायस्टाफ अ‍ॅण्ड केमीकल कंपनीचे मनोज दुबे यांनी रिषभ मेटल्स कंपनीशी संपर्क साधून तीस दिवसांच्या आत मालाची रक्कम देवू असे सांगून उधारिने रसायनाची मागणी केली होती.

त्यानुसार 10 एप्रिल 2019 ते 17 ऑगस्ट 2019 या कालावधीत रिषभ मेटल्सने कंपनीने दुबे यांना 10 लाख 98 हजार 212 रुपयांच्या रसायनांचा पुरवठा केला. मात्र, अनेक महिने उलटूनही पैसे मिळाले नाही.

मनोज दुबे याच्याविरूध्द तक्रार दिली. दुसर्‍या घटनेतील अहमदाबादेतील नॅरोल टेक्सटाईल इन्फ्रास्ट्रक्टचर ण्ड एनव्हिरो मॅनेजमेंट कंपनीने सुध्दा शहरातील रिषभ मेटल्स कंपनीकडे सुमारे 44 लाख 9 हजार 234 रूपयांच्या रसायनांची मागणी केली होती.

अखेर शुक्रवारी ज्ञानदेव वाणी यांच्या फिर्यादीवरूनआरोपींविरुद्धगुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या