Friday, May 10, 2024
Homeक्रीडाIND vs ENG : भारत आणि इंग्लंड संघात आज निर्णायक सामना

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड संघात आज निर्णायक सामना

मुंबई l Mumbai

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा वनडे सामना सर्वात महत्वाचा असणार आहे. कारण या मालिकेत भारत आणि इंग्लंड यांची १-१ अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे मँचेस्टरच्या मैदानात जो तिसरा वनडे सामना होणार आहे तो निर्णायक ठरणार आहे.

- Advertisement -

या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा १० विकेट्सने धुरळा उडवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्या इंग्लंडने शानदार वचपा काढत भारताला १०० धावांनी पराभूत केले. त्याचबरोबर मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. त्यामुळे आज होणार सामना जो संघ जिंकंल, तोच मालिकेचा विजयी संघ ठरेल.

अशा स्थितीत आता टीम इंडियाला विजयाने मालिका आणि दौरा संपवायचा आहे. मँचेस्टरमधील तिसर्‍या एकदिवसीय सामन्यासाठी ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे, तथापि, पावसाची शक्यता नाही.

भारताचा एकदिवसीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह

- Advertisment -

ताज्या बातम्या