Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याएकनाथ खडसेंवर ED ची मोठी कारवाई

एकनाथ खडसेंवर ED ची मोठी कारवाई

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीने (ED) धक्का दिला आहे. ED ने एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांची मालमत्ता जप्त केली आहे.

- Advertisement -

ED ने एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. लोणावळा (Lonawala) आणि जळगाव (Jalgoan) इथल्या मालमत्तेचा समावेश आहे.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर जो मनी लाँड्रिंगचा (Money laundering) गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणाची चौकशी ED गेले काही दिवस करत आहे.

या प्रकरणात एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhari) यांना अटक देखील झाली आहे. या प्रकरणामध्ये जी काही माहिती समोर आली त्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे. अजूनही काही मालमत्ता जप्त केली जाण्याची शक्यता आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

एकनाथ खडसे (Eknath Khadse) फडणवीस सरकारमध्ये (Fadnvis Govt) महसूल मंत्री (Revenue Minister) असताना त्यांनी भोसरी (Bhosari) MIDC येथे ३.१ एकर क्षेत्रफळाचा प्लाॅट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. खडसे यांनी ३१ कोटी रुपये मुल्य असणारा प्लाॅट ३.७ कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे. खडसे यांनी रेडी रेकनर दरापेक्षा (Ready Reckoner Rate) कमी बाजारभाव दाखवून हा व्यवहार केल्याचा आरोप केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या