Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशHero MotoCorp ED Raids : हीरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजाळ यांंच्या घरावर...

Hero MotoCorp ED Raids : हीरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजाळ यांंच्या घरावर ईडीची छापेमारी

नवी दिल्ली | New Delhi

ऑटोमोबाईल कंपनी (Automobile Company) हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) चे चेअरमन पवन मुंजाल (Pawan Munjal) आता ईडीच्या रडारवर आहेत.पवन मुंजाल यांच्या घरी अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने छापेमारी केली आहे. मनी लाँड्रिंगच्या तपासाअंतर्गत हा छापा टाकण्यात आलाय. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार दिल्ली आणि गुरुग्राममधील मुंजाल यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले.

- Advertisement -

लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाल्याने माझी जबाबदारी आणखी वाढली – पंतप्रधान मोदी

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या तक्रारीमुळे हा तपास करण्यात येत आहे. मुंजाल यांच्या निकटवर्तीयाविरोधात कथितरित्या ही तक्रार करण्यात आली आहे. अघोषित परकीय चलन बाळगल्याप्रकरणी या व्यक्तीची चौकशी करण्यात आली होती. दिल्ली आणि शेजारील गुरुग्राम येथील परिसरात छापेमारी करण्यात येत आहे. ईडीच्या छापेमारीची बातमी समोर आल्यानंतर, हीरो मोटोकॉर्प कंपनीचे शेअर्स गडगडले.

PM मोदींचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं गौरव

शेअर्समध्ये घसरण

ईडीच्या छापेमारीनंतर हिरो मोटोकॉर्प कंपनीच्या स्टॉकमध्ये घट झाली आहे. या छाप्यानंतर हीरो मोटोकॉर्पच्या स्टॉकमध्ये घसरण दिसून आली. मंगळवारी दुपारी कंपनीचा शेअर ४.२६ टक्क्यांनी किंवा १३६.४५ रुपयांनी घसरून ३०६७.१० रुपयांवर ट्रेड करत होता.

बनावट कंपन्यांचा आरोप

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं कथित कॉर्पोरेट गव्हर्नन्स समस्यांबद्दल हीरो मोटोकॉर्पविरुद्ध चौकशीचे आदेश दिल्याचे ईटीनं जून महिन्यात एका रिपोर्टमध्ये म्हटले होते. हीरो मोटोकॉर्पवर कथितरित्या शेल कंपन्या चालवल्याचा आरोप आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या