Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात कोळसा टंचाई, पण भारनियमन नाही

राज्यात कोळसा टंचाई, पण भारनियमन नाही

मुंबई

कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती (electricity)कमी झाली असून गरजेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांची वीजेची गरज भागवली जात आहे. राज्यात वीज निर्मिती करणारे 27 पैकी 7 संच बंद आहेत. कोळश्याच्या अभावी हे संच बंद करावे लागले आहेत. त्याला कारणीभूत कोल इंडिया (coal India)असल्याचं सांगत राज्यात कुठेही भारनियमन करण्यात आलेली नाही. नो लोडशेडिंग (no load shedding)हा आमचा कार्यक्रम आहे, असे ऊर्जा मंत्री नितीन राऊत नितीन राऊत (nitin raut)यांनी सांगितलं. राज्यात मागणीच्या तुलनेत 3 हजार मेगावॅट विजेची कमतरता जाणवत आहे. ही विजेची तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

राज्यात दीड दिवसांचा कोळसा : भुसावळ, नाशिकमध्ये आहे इतकाच साठा

पत्रकार परिषदेत नितीन राऊत म्हणाले, “राज्यातील महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पांना कोळशाचा नियमित पुरवठा व्हावा यासाठी मी मागील दोन महिन्यांपासून केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी व केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंग यांच्याशी नियमित संपर्कात आहे. लवकरच या संकटावर आम्ही मात करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वीज कमी वापरा

मी सर्व ग्राहकांना जाहीर नम्र आवाहन करू इच्छितो की सध्याची वीज टंचाईची परिस्थिती लक्षात घेता सकाळ व संध्याकाळी ६ ते १० या वीज मागणीच्या कमाल कालावधीत आपल्या घरातील विद्युत उपकरणांचा कमीत कमी वापर करून वीज बचत करून महावितरणला सहकार्य करावे,असे आवाहन राऊत यांनी राज्यातील जनतेला केले.

11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास विशेष म्हणजे शिखर मागणी (पिक डिमांड) काळात महानिर्मितीने औष्णिक, वायू आणि जल विद्युत केंद्रांतून 8 हजार 119 मेगावॅट इतकी वीज निर्मिती करून कोळश्याच्या कमतरतेच्या काळात सुद्धा राज्याच्या वीज ग्राहकांना पुरेशी वीज उपलब्ध करून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. महावितरणने सुद्धा त्यांची मुंबई वगळता एकूण विजेची मागणी 18 हजार 123 मेगावॅट आणि मुंबईसह एकूण मागणी 20 हजार 870 मेगावॅट सायंकाळी 7 च्या शिखर मागणीच्या सुमारास उद्दिष्टपूर्ती केली असल्याचेही ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या