Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedऊर्जा संवर्धन करु शकते पर्यावरण सुरक्षित

ऊर्जा संवर्धन करु शकते पर्यावरण सुरक्षित

प्रा.डॉ.पी.एस.लोहार

देशाचा विकासदर हा ऊर्जेची उपलब्धता असतो. आपल्याला उपल्ब्ध असलेली ऊर्जा ही कोळसा, तेल व नैसर्गिक वायू ह्या ऊर्जेच्या नैसर्गिक प्रकारांवर अवलंबून असते. हे सर्व लवकर नष्ट होणारे आणि मर्यादित नैसर्गिक स्रोत आहेत. ज्या इन्धनाला तयार होण्यास 30 लाख वर्षे जावी लागली त्याचा 60 टक्के भाग आपण गेल्या 200 वर्षातच खर्च केला आहे.

- Advertisement -

विकासकामांसाठी आणि एकंदरीतच आधुनिक राहणीसाठी लागणा-या ऊर्जेची म्हणजेच साध्या भाषेत विजेची गरज भागवण्यासाठी अजूनही खनिज इंधनांचाच वापर मुख्यत: केला जात आहे. परंतु, यामुळे प्रदुषणासारख्या समस्या वाढून जीवसृष्टीला धोका निर्माण झालेला आहे. वापरल्या जाणा-या ग्रामीण उर्जेपैकी 80 टक्के ऊर्जा ही जैवभारापासून तयार केलेली असते. त्यामुळं खेड्यांमधे आधीच लुप्त होत असलेल्या वनक्षेत्रावर प्रचंड दबाव येत आहे. 2004 सालापासून, नवीन व पुनर्वापरयोग्य ऊर्जास्रोत मंत्रालयाच्या पुढाकाराने, भारतात 14 डिसेम्बर हा ऊर्जा संवर्धन दिवस साजरा होऊ लागला आहे.

पारंपरिक ऊर्जा निर्मितिमुळे पर्यावरणाचीही अपरिमित हानि होते आहे. इ स 1860 पेक्षा आजचे जागतिक तापमान जवळ पास 0.75 अंशाने वाढले आहे. ते ह्या शतकाच्या शेवटी 6 अंशानी वाढण्याची शक्यता आहे. ह्या सर्वान्वर ऊर्जा संवर्धन हा एकच उपाय आहे. ऊर्जा संवर्धन म्हणजे परिणामात फरक न करता ऊर्जेचा न्याय्य उपयोग आणि ऊर्जेच्या वापराचे प्रमाण कमी करणे. शेती, शिक्षण, वाहतूक, रोजगार निर्मिती, स्वच्छ पाण्याची उपलब्धता, स्वयंपाक या सर्व दैनंदिन कामांमध्ये ऊर्जा केंद्रस्थानी असते.

आपल्याकडे अजूनही ग्रामीण भागात स्वयंपाक आणि इतर कामांसाठी लाकूडफाटा मोठ्या प्रमाणात जाळला जातो. यामुळे जंगलतोड तर होतेच: शिवाय धूर, आरोग्य, आग यांसारखे इतर प्रश्न निर्माण होतात. उर्जेनिर्मितीसाठी आपल्या देशाला पेट्रोलियम उत्पादने आयात करावी लागतात. त्यमुळे आपल्याला परकीय चलन तर खर्च करावे लागतेच पण आपली ऊर्जा सुरक्षा धोक्यात येते. पारंपारिक वीज जाळ्यावरील ताण कम होऊन ऊर्जानिर्मितीचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठीअपारंपरिक आणि पुनर्वापर करण्यायोग्य ऊर्जेवर भर द्यायला हवा.

सौर, पवन, कृषीजन्य टाकाऊ पदार्थ, जल, सेंद्रिय कचरा, औद्योगिक टाकाऊ पदार्थ, जैव-अवशेष, वैद्यकीय-अवशेष ही अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचे स्त्रोत आहेत. दैनंदिन जीवनातील ऊर्जा वापर तपासून त्यामध्ये अपारंपरिक ऊर्जा वापररावर भर देणे. अशा ऊर्जेची माहिती देणारे प्रकल्प- नमुने इ. बनवणे. सूर्य चूल, सोलर हिटर, सौरदिवा यांसारख्या उपकरणांच्या वापरावर भर देणे. पिवळ्या दिव्यांच्या तुलनेमध्ये फक्त 1/3 ऊर्जा वापरून तेवढाच प्रकाश देणारे कॉम्पॅक्ट फ्लूरोसंट लाइट (सीएफ्एल) किंवा लाईट इमिटिंग डिव्हाइस(एलईडी) वापरून 75 टक्के ऊर्जा वाचू शकते.

भारतात सध्या ऊर्जेचा एकूण तुटवडा 8 टक्के आहे . हाच तुटवडा कमाल मागणीच्या काळात 13 टक्क्यांन्वर जातो. ट्यमुळे आपल्याला भारनियमन सहन करावे लागते. तर एका अन्दाजानुसार, घरगूती वापर, दुकान,उद्योग, शेती, वाह्तूक हे सर्व क्षेत्र मिळून 20 टक्के वीज वाचवीता येइल. असे केल्यास आपल्याला भारनियमन सहन करावे लागणार नाही. आपल्या गरजा ओळखणे आणि त्या मर्यादित करणे हा उर्जासंवर्धानाचा पाया आहे. ऊर्जा वाचवणे हे ऊर्जा निर्माण करण्यापेक्षा खूप सोपे आणि बिनखर्चाचे आहे. त्याद्वारे आपण एक प्रकारे पर्यावरणाचा र्‍हास थांबवून जीवसृष्टीला वरदान देऊ शकतो. आपल्या दैनन्दिन आयुष्यात वीज आणि ऊर्जा वाचवून देशाच्या प्रगतीला हातभार लावला तरच पुढच्या पिढीचे भवितव्य सुरक्षित राहील.

(लेखक चोपडा महाविद्यालयातील विज्ञानाचे वरीष्ठ प्राध्यापक असून विद्यापीठात अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या