Saturday, April 27, 2024
Homeधुळेअडथळा निर्माण करणारे अतिक्रमण काढले

अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण काढले

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरातील मामलेदार कचेरी ते बारापत्थर चौक दरम्यान वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या व्यावसायिकांवर शहर पोलीसांनी कारवाई केली.

- Advertisement -

सुमारे 16 जणांना थेट शहर पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या विरोधात भादंवि 283 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील मुख्य चौकात अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. महापालिका आणि शहर वाहतुक शाखेने कारवाई केल्यानंतर काही दिवस चौक मोकळे होतात. परंतु नंतर पुन्हा अडथळा निर्माण होता.

आज शहर पोलिसांनी तहसिलदार कार्यालय ते बारा पत्थर चौक दरम्यान असलेल्या व वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई केली. अतिक्रमण करणार्‍यांना थेट शहर पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील मामलेदार कचेरी ते बारापत्थर चौक दरम्यान वाहतुकीची कोंडी ही रोजची डोकेदुखी आहे. काही दिवसांपुर्वी याच चौकात दुचाकी लावण्यावरून वाद होऊन हाणामारीची घटना घडली होती.

त्यानंतर काही दिवस वाहतुक सुरळीत झाली. मात्र पुन्हा या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याने अनर्थ घडण्याची शक्यता लक्षात घेवून पोलीसांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बैरागी, नाना आखाडे, हेकॉ. भिका पाटील पोना. प्रल्हाद वाघ, पोकॉ. पंकज खैरमोडे, निलेश पोद्दार, राहुल पाटील, नरेंद्र परदेशी, प्रसाद वाघ, विवेक साळुंके, नरेंद्र राठोड यांनी कारवाई केली. यावेळी रस्त्यावर अतिक्रमण तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या गॅरेज तसेच कुशन दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. सुमारे 16 जणांना थेट शहर पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या विरोधात भादंवि 283 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या