Thursday, April 25, 2024
Homeनाशिकशहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरु

शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरु

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात (nashik city) विविध भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण (Encroachment) झाले आहे. अनेक वेळा नोटीस देऊन तसेच सूचना करूनही अतिक्रमण काढले जात नाही. एकीकडे महापालिका प्रशासनाने (Municipal administration) ठीकठिकाणी हॉकर्स झोन (Hawkers Zone) तयार केले असले तरी त्याचा पुरेपूर वापर होताना दिसत नाही, तर दुसरीकडे मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण होत असल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

याबाबत मागच्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सर्व सदस्यांनी याबाबत आवाज उठवल्याने दिवाळीनंतर (diwali) शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम (Encroachment Eradication Campaign) हाती घेण्याचे आदेश स्थायी समिती सभापती गणेश गीते (Standing Committee Chairman Ganesh Geete) यांनी दिले होते. प्रभारी आयुक्तांनी त्वरित सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन याबाबत सूचना केल्या होत्या. यानुसार उद्या (दि.8) पासून शहरात विशेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

अतिक्रमणधारक आणि अतिक्रमण निर्मूलन विभागातील अधिकार्‍यांचे साटेलोटे असल्यामुळेच शहरात अतिक्रमणे वाढल्याचा गंभीर आरोप सदस्यांनी सभेत करून आंदोलनाचा (Movement) इशारा दिला होता. सभापतींच्या आदेशांनंतर अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी देखील विभागीय अधिकार्‍यांची तातडीची बैठक बोलवत सोमवार (दि.8) पासून मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या