Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकगोदाघाट परिसरात अतिक्रमण कारवाई

गोदाघाट परिसरात अतिक्रमण कारवाई

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार (Nashik Municipal Commissioner and Administrator Ramesh Pawar )यांनी गंगाघाट ( Godaghat ) परिसर सुटसुटीत करण्याचा चंग बांधला आहे. यानुसार त्यांनी पहिल्या वेळेला पायी तसेच दुसर्‍या वेळेला रिक्षाने या संपूर्ण भागाचा अभ्यास करून येथील सर्वप्रकारचे अतिक्रमण हटविण्याचे आदेश (Encroachment removal order )दिल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सुमारे 200 लहान-मोठ्या अतिक्रमणांवर हातोडा चालवला.

- Advertisement -

गुरुवारी (दि.21) झालेल्या कारवाईनंतर गंगाघाट परिसरात पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची देखील दक्षता घेण्यात येत असून शनिवार तसेच रविवार या सुटीच्या दिवशी देखील या संपूर्ण परिसरात अतिक्रमण करणार्‍यावर मनपा कारवाई करीत असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करूणा डहाळे यांनी दिली आहे.

यासाठी महापालिकेचे पंचवटी तसेच पूर्व विभाग अधिकार्‍यांची विशेष पथक पोलीस संरक्षणासह या ठिकाणी कायम सतर्क ठेवण्यात आले आहेत. गंगाघाट परिसरात जगभरातून लाखो भाविक भक्तिभावाने येतात. मात्र या ठिकाणी विविध प्रकारचे खाद्यपदार्थांस इतर साहित्य विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले होते. यशवंत पटांगण असो की गौरी पटांगण सर्व ठिकाणी अतिक्रमण धारकांचा कब्जा झाल्याचे दिसत होते.

मात्र, भाविकांना ज्या पूजा साहित्याची गरज होती त्या दुकानदारांना देखील अतिक्रमणधारकांनी दूर फेकले होते. यामुळे महापालिका आयुक्तांनी या संपूर्ण परिसरात पाहणी दौरा केल्यानंतर या पवित्र असणार्‍या गंगाघाट परिसरात फक्त पूजासाहित्य विक्री करणार्‍यांना अत्यंत शिस्तीत दुकाने लावण्यासाठी परवानगी मिळणार असून इतर सर्व प्रकारच्या दुकानांना हटविण्याचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी सकाळी दिवसभर या ठिकाणी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली.

अतिक्रमण कारवाई करण्यापूर्वी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या संपूर्ण परिसरात पाहणी करून भोंग्याद्वारे लोकांना आवाहन केले होते. यानुसार अनेकांनी आपले अतिक्रमण पूर्वीच काढले होते तरीही गुरुवारी महापालिकेच्या पथकाने सुमारे 200 लहान-मोठे अतिक्रमणांवर हातोडा चालवला. दरम्यान हा संपूर्ण परिसर चांगला सुंदर दिसावा म्हणून अतिक्रमण होणार नाही याची दक्षता देखील महापालिका प्रशासन घेत असून आज व उद्या सुट्टीच्या दिवशी देखील या ठिकाणी अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या