Saturday, April 27, 2024
Homeनगररोजगार हमीच्या पैशासाठी 7 तारखेला मोर्चाचे आयोजन

रोजगार हमीच्या पैशासाठी 7 तारखेला मोर्चाचे आयोजन

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत विविध कामांचे लाभार्थ्यांना पैसे मिळावेत, यासाठी तालुक्यातील लाभार्थ्यांसह सर्वपक्षीय मोर्चा पाथर्डी पंचायत समितीवर काढण्याचे निवेदन तालुका प्रशासनाला देण्यात आले आहे. येत्या 7 जुलैला या मोर्चाचे नियोजन असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी केले.

- Advertisement -

तालुक्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तीक लाभाच्या योजना राबविण्यात आलेल्या आहेत. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे रोजगार हमी योजनेमधील गायगोठा व फळबाग योजनेतील लाभार्थ्यांना कुशल अकुशलचे अनुदान गेली 6 महिन्यांपासून मिळालेले नाही. प्रशासनाने लाभार्थी शेतकर्‍यांना वेठीस धरलेले आहे. सद्यस्थितीत प्रशासक असल्याने पंचायत समितीत मनमानी कारभार सुरू आहे.

शेतकरी लाभार्थी यांनी गायगोठे, विहिरी,फळबाग इत्यादी योजनेमधून कामे व्याजाने पैसे काढून केलेली आहे. प्रशासनाने शेतकर्‍यांची पिळवणूक करून हेळसांड केली आहे. 31 मार्च पूर्वी रोजगार हमी योजनेतील पैसे जिल्हा परिषदेला जमा असताना पाथर्डी पंचायत समितीने या पैशाचे वितरण केले नाही. रोजगार हमी योजनेतील शासकीय यंत्रणेच्या गलथान कारभारामुळे लाभार्थी या योजनेच्या पैशासाठी वंचित राहिले आहेत.

शेतकर्‍यांच्या गाय गोठ्याच्या बांधणीसाठी शासन 77 हजार रुपये देते, या योजनेतील गरीब लोकांनी गाय गोठा बांधण्यासाठी पैशाची उसनवारी करू तर काहींनी व्याजाने पैसे काढून ही योजना पूर्ण केली. मात्र पाच ते सहा महिने झाले या योजनेतील शेकडो लोकांना अद्यापपर्यंत पैसे मिळाले नाहीत. निवेदनावर संतोष कुसळकर, पप्पू शेख, कृष्णा फुंदे, अनिल दहिफळे, नितिन मासाळ,विकास गोरे, अंबादास फुंदे, संजय आंधळे, गणेश म्हस्के, चैतन्य गोरे, कृष्णा गायकवाड, अनिल जाधव, राजेंद्र राठोड, किशोर देशमुख, बाळासाहेब काकडे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या