मालकांना कर्मचाऱ्यांचे ‘हे’ काम करणे बंधनकारक

jalgaon-digital
1 Min Read

सातपूर । Satpur

कामगार कर्मचारी भविष्य निधी विभागाने खातेधारकांचे (पीएफ) खाते त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडणे रोजगार देणार्‍या मालकानीच करणे बंधन कारक केले आहे. तसे न केल्यास पीएफ खात्यात कंपनीचे योगदान थांबविण्या सोबतच त्यांचे इलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न (ईसीआर) भरता येणार नसल्याचे निर्देश दिले आहेत.

सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 कायद्याच्या कलम 122 अंतर्गत ’ईपीएफओ’ने सर्व कंपन्यांना त्यांच्या कर्मचार्‍यांचे पीएफ खाते आणि युनिव्हर्सल खाते क्रमांक (यूएएन) आधारशी जोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसे जोडले नसेल, तर त्या संदर्भात पाठपुरावा करण्याच्या सूचनाही ’ईपीएफओ’ने पीएफ खातेधारकांना दिल्या आहेत.

त्यामुळे ’ईपीएओ’ अखंड सेवेसाठी पीएफ खाते आणि यूएएन क्रमांक आधारशी जोडले असल्याची खात्री करणे गरजेचे असून, ’ईपीएफओ’चे पोर्टल आणि उमंग अ‍ॅपवर उपलब्ध ऑनलाइन ई-केवायसीसुविधेद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. सभासदांनी ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

विमा कवचाला मुकणार

ज्या कर्मचार्‍यांनी पीएफ आणि आधार लिंक केलेले नाही, त्यांचे एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्सचा (ईडीएलआय) प्रीमियम जमा होणार नाही. त्यामुळे त्याअंतर्गत देण्यात येणार्‍या 7 लाखांपर्यंतच्या विम्याचा लाभही दिला जाणार नाही. मालकाचे अंशदान जमा झाले नाही तर त्याला प्राप्तिकराअंतर्गत सवलत मिळण्यातही अडचणी होणार आहे.

त्यामुळे मालकांनी आपल्या कर्मचार्‍याचे पीएफ खाते आणि यूएएन क्रमांक आधारशी जोडले असल्याची खात्री करणे गरजेचे आहे त्याच सोबतच कर्मचार्‍यांनीही याबाबत जागरुक होणे गरजेचे आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *