प्रशासक राजवटीत सेवकांचे आंदोलन सुरुच

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मागील मार्च महिन्यापासून नाशिक महापालिकेत (Nashik Municipal Corporation) प्रशासक राजवट (administrative rule) सुरू आहे.

त्यामुळे महापालिकेच्या कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. एकीकडे महापालिकेच्या तिजोरीत खळखळाट असल्याने मोठी विकास कामे (Development works) होत नसल्याची ओरड आहे.

तर दुसरीकडे पावसामुळे (rain) झालेले खड्डे (potholes) अद्याप पर्यंत पूर्णपणे बुजविण्यात आलेले नाही. त्यामुळे देखील नागरिकांमध्ये नाराजी आहे. तर कधी महापालिकेच्या घंटागाडी सेवक (ghantagadi) तर कधी वॉटर ग्रेस सेवक (water grace employee), घंटागाडी सेवक आंदोलन (agitation) करत असल्यामुळे महापालिका प्रशासनाचे कामकाज कशा पद्धतीने चालू आहे ते दिसून येत आहे.

ऐन दिवाळीच्या काळात वॉटर ग्रेस सेवकांनी आंदोलन (agitation) केल्यामुळे पेच निर्माण झाला होता. हा वाद अद्याप सुरूच आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष दिलीप दातील (Maharashtra Navnirman Sena City President Dilip Datil) यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी हा मुद्दा थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत नेला आहे. त्याचप्रमाणे वेळेवर वेतन मिळत नसल्यामुळे महापालिकेच्या सिटीलिंक (Citylink) सेवकांनी दुसऱ्यांदा आंदोलन करून पगार वेळेवर मिळावा अशी मागणी केली आहे.

त्याचप्रमाणे घंटागाडी कर्मचाऱ्यांचे देखील अधून मधून आंदोलन सुरूच आहे. महापालिकेच्या माध्यमातून सेवक शहरात कामे करतात, मात्र त्यांच्या मागण्यांकडे का दुर्लक्ष होत आहे. असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. त्याचप्रमाणे सध्या प्रशासक राजवट (Administrator regime) सुरू आहे. यामुळे लोकांची कामे अधिक गतीने व्हायला हवी, अशी अपेक्षा असताना महापालिकेच्या कंत्राटी सेवकांनाच आंदोलन करण्याची वेळ का येत आहे, असे देखील विचारले जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *