Wednesday, April 24, 2024
Homeनगरअपहार प्रकरण : पोलिसांनी नगर अर्बन बँकेकडून मागितली कागदपत्रे

अपहार प्रकरण : पोलिसांनी नगर अर्बन बँकेकडून मागितली कागदपत्रे

अहमदनगर (प्रतिनिधी) –

नगर अर्बन बँकेत झालेल्या तीन कोटींच्या अपहार प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बँकेकडून मागवली

- Advertisement -

असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नगर अर्बन बँकेत 2017 मध्ये दोन संशयास्पद नोंदींच्या आधारे अडीच कोटी व अन्य 50 लाख मिळून तीन कोटींचा अपहार झाल्याचा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात नुकताच दाखल झाला आहे. बँकेचे माजी अध्यक्ष व भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, बँकेचे अधिकारी व कर्जदार यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे. कोतवाली पोलिसांत दाखल झालेला हा गुन्हा आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.

या गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे पोलिसांनी आता बँकेकडून मागवली आहेत. ती आल्यानंतर पुढील तपास केला जाणार आहे. यामध्ये संबंधित संचालकांचे व अधिकार्‍यांचे जबाब नोंदवले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. फसवणुकीच्या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यास तो गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जातो. आर्थिक गुन्हे शाखा संबंधित गुन्ह्याचा तपास करत असताना सर्व पुरावे व कागदपत्रांची पडताळणी करून आरोपीवर अटकेची कारवाई करतात. यामुळे आता बँकेकडून कागदपत्रे आल्यावर त्याचा अभ्यास करून पुढील कारवाई होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या