Thursday, April 25, 2024
Homeजळगावरेल्वेच्या खाजगीकरणला विरोध,आजपासून अधिवेशन

रेल्वेच्या खाजगीकरणला विरोध,आजपासून अधिवेशन

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

रेल्वे प्रशासनातर्फे Railway Administration रेल्वेचे खासगीकरण Privatization of Railways करण्यासाठी षड्यंत्र सुरू असून कुठल्याही परिस्थितीत प्रशासनाचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही, याकरिता 10 ते 12 डिसेंबर या दरम्यान सेंटर रेल्वे Center Railway व कोकण रेल्वे Konkan Railway या विभागाचे भुसावळ येथे तीन दिवसीय अधिवेशन Convention होत आहे,

- Advertisement -

अधिवेशनाला एआयआरएफ सचिव शिवगोपाल मिश्रा हे संबोधणार असून अधिवेशनाला मध्य व कोकण रेल्वेचे 300 पेक्षा जास्त कार्यकर्ते, पदाधिकारी सहभाग घेणार असल्याची माहिती एनआरएमयु संघटनेचे मध्य रेल्वेचे महामंत्री वेणू नायर यांनी कामगार भवन येथे आयोजीत पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी भुसावळ विभागाचे संघटनेचे अध्यक्ष पुष्पेंद्र कापडे, सचिव आर.आर. निकम व पदाधिकारी उपस्थित होते.

रेल्वेच्या खाजगीकरणला विरोध करत एनआरएमयु संघटना आक्रमक झाली असून 2013 नंतर प्रथमच भुसावळ येथे मोठ्या प्रमाणात संघटनेचे अधिवेशन होत आहे. रेल्वे प्रशासन खाजगीकरण करिता पाउल उचलत आहे. मात्र त्यांचे हे नापाक मनसुबे कधीही पूर्ण होऊ देणार नाही, रेल्वे प्रशासनाकडून 1 हजार 400 कि. मी. पर्यंतचे रूळ व 700 रेल्वे स्थानक विक्रीस काढण्यात आले होते. मात्र, यास कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही व त्यांना प्रतिसाद मिळू देणार नाही, अशी माहितीही यावेळी नायर यांनी दिली. खाजगीकरण करणे म्हणजे गोरगरीब प्रवाशांच्या हक्कांवर गदा आणणे, तसेच रेल्वे कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना मिळणार्‍या सुविधा खाजगीकरणाच्या नावाने संपुष्टात आणण्यासाठी षड्यंत्र सुरू आहे. आम्ही रेल्वेचे गुलाम नसून सेवक आहेत व संविधानाने दिलेल्या अधिकारांमुळे आम्ही आमच्या मागण्या लोकशाही पद्धतीने नक्कीच मार्ग काढू मजूर कर्मचार्‍यांच्या हक्कावर गदा आणली जात आहे, याशिवाय रेल्वे कॉलनी, शाळा, स्टेडीयम, आरोग्याच्या सुविधा तसेच बहुतांश विषय रेल्वे खाजगी करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र तसे कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असे शेवटी पत्रकार परिषद नायर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या